Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान शेजारच्या मिझोराम राज्यात मैतई समुदायाला धमक्या मिळत आहेत. मिझोराममधील बंडखोरांनी मैतई समुदायाला राज्य सोडून जाण्याची जाहीरपणे धमकी दिली आहे. यानंतर मिझोरम सरकारने राजधानी ऐजॉलमधील मैतई लोकांसाठी सुरक्षा वाढवली आहे.
शुक्रवारी ऐजॉलमधून जारी केलेल्या निवेदनात, पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ने मैतई लोकांना त्यांची "सुरक्षा" प्रिय असल्यास मिझोराम सोडण्यास सांगितले. कारण मैतई आणि कुकी समुदयाच्या भांडणात दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेनंतर मिझो तरुणांमध्ये संताप आहे.
PAMRA ही मिझो नॅशनल फ्रंट (MNF) च्या बंडखोरांची एक गैर-राजकीय संघटना आहे, जी मिझो शांतता कराराच्या सर्व कलमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, PAMRA ने म्हटले आहे की मणिपूरमधील (Manipur) कुकी समुदयाच्या विरोधातील हिंसाचारामुळे मिझोच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच मिझोराममधील मैतई लोकांवर हल्ला झाला तर जबाबदारी ते स्वतः स्वीकारतील असा इशाराही या संघटनेने दिला आहे. मिझोरममधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
मणिपूरमधील मैतईवासीयांच्या रानटी आणि घृणास्पद कृत्यांमुळे मिझोरममध्ये राहणे सुरक्षित राहिलेले नाही... PAMRA मिझोरामच्या सर्व मैतईंनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याचे आवाहन करते," असे निवेदनात म्हटले आहे.
मिझोराम सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, मैतई समुदयाला घाबरण्याची काही एक गरज नाही आम्ही योग्य ती पावले उचलली आहेत. वृत्तानुसार, मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना मिझोराममधील (Mizoram) मैतई लोकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, या घडामोडीनंतर मणिपूर सरकारने मिझोराम आणि केंद्राशी पुन्हा चर्चा केली.
मिझो तरुणांमध्ये संताप आहे, असे बंडखोरांच्या वक्तव्यात म्हटले आहे. मणिपूरमधील कुकी लोकांविरुद्ध "मैतेई समुदयाने केलेल्या रानटी आणि घृणास्पद कृत्यामुळे त्यांना खूप दुःख झाले आहे. त्यात मिझो लोक जो-कुकी वंशाचे असल्याचे नमूद केले आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्य सोडण्याचे आवाहन केवळ मणिपूरच्या मैईतेई लोकांसाठी होते, इतर कोणासाठी नाही. मिझोराममध्ये विद्यार्थ्यांसह हजारो मैतई राहतात. यातील बहुतांश मैतई हे मणिपूर आणि आसाममधील आहेत.
मणिपूरमधून विस्थापित झालेल्या 12,000 हून अधिक कुकींनी ईशान्येकडील मिझोराम राज्यात आश्रय घेतला आहे, जे प्रामुख्याने ख्रिश्चन आहे. कुकी देखील बहुतेक ख्रिश्चन आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.