UGC New Guidelines: आता विद्यापीठातील विद्यार्थीच बनणार शिक्षक; 5 निरक्षरांना शिकवणे सक्तीचे...

100 टक्के सारक्षरतेच्या लक्ष्यासाठी नवीन शैक्षणिक सत्रापासून मोहीम
UGC New Guidelines
UGC New Guidelines Dainik Gomantak

UGC New Guidelines: 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न घेऊन केंद्र सरकार काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

त्यासाठी नवीन साक्षरता अभियान तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान पाच निरक्षर लोकांना शिकवणे आवश्यक असेल. यासाठी, त्यांना क्रेडिट स्कोअर देखील मिळेल, जो त्यांच्या अभ्यासक्रमात जोडला जाईल.

UGC New Guidelines
Adani Vs Hindenburg: हिंडेनबर्ग रिपोर्ट म्हणजे भारतावरील हल्ला, सर्व आरोप खोटे असल्याचा अदानी ग्रुपचा दावा

नवीन साक्षरता योजना राबविण्याच्या सूचना

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक सत्रापासूनच नवीन साक्षरता योजना लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी सविस्तर गाईड लाईनही (मार्गदर्शक तत्वे) जारी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये प्रत्येक कोर्सचे प्रोजेक्ट वर्क आणि असाईनमेंट त्याच्याशी जोडण्यास सांगितले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असेल.

या योजनेंतर्गत निरक्षरांना शिकवण्यासाठी पाच क्रेडिट स्कोअर मिळेल. तथापि, हा क्रेडिट स्कोअर तेव्हाच मिळेल जेव्हा शिकणाऱ्याला साक्षर असल्याचे प्रमाणपत्र मिळेल. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात आणि राज्य सरकारच्यावतीने काही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

UGC New Guidelines
Sweden Girl Marriage: स्वीडनच्या मुलीची वरात थेट उत्तरप्रदेशच्या गावात! फेसबूकवरून जुळले प्रेम...

यूजीसीच्या मते, या उपक्रमामुळे साक्षरता मोहिमेला गती मिळेल. सध्या देशातील साक्षरतेचे प्रमाण सुमारे 78 टक्के आहे. यासह सुरू झालेल्या नवीन मोहिमेत ते 100 टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, यूजीसीने निरक्षर लोकांना शिकवण्यासाठी विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याबाबतही सुचवले आहे जेणेकरून ही मोहीम अधिक चांगल्या पद्धतीने राबवता येईल.

तज्ज्ञांच्या मते, या उपक्रमामागे विद्यार्थ्यांवर अभ्यासासोबतच काही जबाबदारी देण्याचे सरकारचे मत आहे. यातून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडून घेण्याची चांगली संधीही मिळेल. दरम्यान, सध्या देशात एक हजाराहून अधिक विद्यापीठे आणि सुमारे 45 हजार महाविद्यालये आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com