Terror Funding: दाऊद इब्राहिम अन् त्याच्या साथीदारांवर एनआयएची मोठी कारवाई

NIA big action on Dawood: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये बसून भारताविरुद्ध कट रचत आहे.
Dawood Ibrahim Latest News
Dawood Ibrahim Latest NewsDainik Gomantak
Published on
Updated on

NIA big action on Dawood: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये बसून भारताविरुद्ध कट रचत आहे. या क्रमाने, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाऊद इब्राहिम, त्याचा सहकारी छोटा शकील आणि 'डी कंपनी' च्या इतर तीन सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई आणि इतर भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी गोळा केल्याच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे एजन्सीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे.

Dawood Ibrahim Latest News
दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपला? ईडीसमोर साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

आरोपपत्रात या दहशतवाद्यांचे नावे

एनआयएच्या (NIA) आरोपपत्रात इब्राहिम आणि शकील यांच्या व्यतिरिक्त आरिफ अबुबकर शेख उर्फ ​​आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ ​​मोहम्मद सलीम कुरेशी यांचा समावेश आहे. एनआयएने आरोपपत्रात म्हटले की, 'सर्व आरोपी डी-कंपनी आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचे सदस्य आहेत.'

भारताविरुद्ध दहशतवादी कारस्थान

एनआयएने सांगितले की, 'कटाचा एक भाग म्हणून या सर्व आरोपींनी लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली. आरोपींनी भारताची (India) सुरक्षा धोक्यात आणण्याच्या आणि सामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने कट रचला होता.'

Dawood Ibrahim Latest News
'लड़ेंगे, जीतेंगे...': दाऊद इब्राहिम प्रकरणात नवाब मलिक यांना अटक; 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

दाऊदवर मोठे बक्षीस

अटक केलेल्या आरोपींनी परदेशात फरार/वाँटेड आरोपींकडून हवाला माध्यमातून मोठी रक्कम मिळवल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मुंबई आणि भारताच्या इतर भागात दहशतवादी/गुन्हेगारी कृत्ये घडवून आणणे हा त्यांचा हेतू होता. दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) 25 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

Dawood Ibrahim Latest News
NCB चा मोठा खुलासा, भारताविरुद्ध दाऊद रचतोय कट, ISI शी केली हातमिळवणी

या फरार दहशतवाद्यांचा शोध सुरु

दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानातील कराची येथे आहे. लष्कर प्रमुख हाफिज सईद, जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सय्यद सलाहुद्दीन आणि जैश नंबर 2 अब्दुल रौफ असगर यांच्यासह भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार/दहशतवाद्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com