Dawood Ibrahim
Dawood IbrahimDainik Gomantak

NCB चा मोठा खुलासा, भारताविरुद्ध दाऊद रचतोय कट, ISI शी केली हातमिळवणी

Pakistan Dawood Ibrahim: भारत हा नेहमीच पाकिस्तान, अंडरवर्ल्ड माफिया आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिला आहे.

Pakistan Dawood Ibrahim: भारत हा नेहमीच पाकिस्तान, अंडरवर्ल्ड माफिया आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. या सर्वांचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे. गेल्या काही दशकांपासून देशात दहशत पसरवण्यासाठी कराचीत बसून दाऊद प्लॅन करत आहे.

दरम्यान, दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड माफियांच्या मदतीने भारतातील तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा सातत्याने पाकिस्तानकडून प्रयत्न होत आला आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या NCB ने आता मोठा खुलासा केला आहे. देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डी गँग आणि ड्रग्जचा काळा धंदा यांच्यात साटंलोटं आहे.

Dawood Ibrahim
Dawood Ibrahim: एनआयकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखाच बक्षीस जाहीर

NCB चा मोठा खुलासा

NCB ने नुकतेच भारतीय नौदलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत 60 किलो उच्च दर्जाचे एमडी ड्रग जप्त केले होते. ज्याची किंमत अंदाजे 120 कोटी रुपये होती. त्याचवेळी, नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आणि मुंबई (Mumbai) विमानतळावरील सफरचंद संत्र्याच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेले 50 किलोहून अधिक कोकेन यांची किंमत 500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. पकडलेल्या आरोपींच्या प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीला धक्कादायक माहिती मिळाली.

दाऊद इब्राहिम मोठा कट रचत आहे

एनसीबीच्या अधिका-यांनी सांगितले की, 'दीड वर्षात एनसीबीने आठ यशस्वी ऑपरेशन्स राबवली. ज्यामध्ये असे साम्य आढळून आले की, ज्यांचे कनेक्शन दाऊद इब्राहिम, ड्रग माफिया हाजी सलीम आणि पाकिस्तानात बसलेल्या इसिसशी आहे.'

Dawood Ibrahim
Red Fort Attack Case: दहशतवादी अशफाकला 'फाशीच'; SC ने फेटाळली याचिका

भारताला धक्का देण्याचा प्रयत्न

NCB झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी सांगितले की, 'अमली पदार्थांची ही संपूर्ण खेप अफगाणिस्तान, पाकिस्तान (Pakistan) आणि इराणमधून येत आहे. तो भारतासाठी डली क्रीसेंट बनला आहे. हे तस्कर केवळ ड्रग्जच नव्हे तर एके 47 सारख्या धोकादायक शस्त्रांचीही तस्करी करतात. मात्र हे गुन्हेगार वेळोवेळी आपला मार्ग बदलत आहेत.'

Dawood Ibrahim
श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव चिनी कर्जाच्या गर्तेत ; फोर्ब्स

मुंबई टार्गेटवर

ते पुढे म्हणाले की, 'जर त्यांना मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करायचा असेल तर ते आधी देशाच्या दक्षिणेकडील बंदरावर ड्रग्सची खेप उतरवतात. नंतर त्यांच्या नेटवर्कद्वारे मुंबईत त्याची एन्ट्री होते. कराचीहून येणारी ही अमली पदार्थांची खेप इराणी बोटींच्या मदतीने भारतात येते. हे तस्कर बोटींचाही सहारा घेतात जेणेकरुन पकडले गेल्यास ते ड्रग्जच्या खेपेचे पुरावे नष्ट करण्यासाठी समुद्रात फेकून देऊ शकतात.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com