NIA Raids: अल-कायदाच्या कटाचा पर्दाफाश! NIA ची 5 राज्यांमध्ये छापेमारी; बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचे षडयंत्र

Gujarat Terror Conspiracy: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अल-कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला.
Gujarat Terror Conspiracy
NIADainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Terror Conspiracy: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अल-कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला. या संघटनेने गुजरातमध्ये कथितपणे अवैध बांगलादेशी स्थलांतरितांच्या मदतीने दहशतवादी कारवाया करण्याचे षडयंत्र रचले होते. या संदर्भात, एनआयएने बुधवारी (12 नोव्हेंबर) पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरातमध्ये सुमारे 10 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनानुसार, एनआयएच्या पथकांनी या सर्व राज्यांमध्ये संशयित व्यक्ती आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आणि तपासणी केली.

4 बांगलादेशी घुसखोरांची नावे उघड

या कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर ही सर्व सामग्री फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. एनआयएने (NIA) 2023 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण कटाच्या केंद्रस्थानी चार बांगलादेशी नागरिक होते. त्यांची नावे अनुक्रमे मोहम्मद सोजिबमियान, मुन्ना खालिद अन्सारी, अजरुल इस्लाम आणि अब्दुल लतीफ अशी आहेत.

Gujarat Terror Conspiracy
Mumbai Airport: मोठी बातमी! मुंबई विमानतळावर आयसिसच्या 2 दहशतवाद्यांना अटक, NIA ची मोठी कारवाई; 3 लाखांचे इनाम, 2 वर्षे होते फरार

अवैध घुसखोरांची दहशतवादी कृत्ये

छापेमारीदरम्यान या अवैध घुसखोरांच्या कारनाम्यांचा खुलासा झाला. या चौघांनी बनावट भारतीय ओळखपत्रांचा वापर करुन बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश केला होता. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात आलेल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे आढळून आले.

कारवाया

हे लोक बांगलादेशात सक्रिय असलेल्या अल-कायदाच्या दहशतवाद्यांसाठी पैसे गोळा करणे आणि त्यांना पैसा पुरवणे या कामात सहभागी होते. यासोबतच, ते भारतातील मुस्लिम तरुणांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी सक्रियपणे प्रेरित करण्याचे काम करत होते.

Gujarat Terror Conspiracy
Terror Funding Case: पाक समर्थित दहशतवादी संघटनांवर NIA ची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये 9 ठिकाणी छापेमारी

चार्जशीट आणि तपासणीचा वेग

दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्याजवळ नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून त्यांच्या कारवाईचा वेग वाढला आहे. एनआयएने याप्रकरणी यापूर्वीच, 10 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादच्या एका विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल केली. अल-कायदा बांगलादेशी नागरिकांचा वापर करुन भारतात घातपात घडवण्याचा मोठा कट रचत होती. या छापेमारीमुळे त्या कटाचे अधिक धागेदोरे आणि पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com