Shocking! 'रंग सावळा' म्हणून वारंवार अपमान; 10 वेळा लग्नाला नकार मिळाला, 11व्या स्थळाआधीच तरुणीनं गळफास घेवून संपवलं जीवन

Bihar Crime News: भारतात 21व्या शतकातही रंगावरुन टोमणे मारणे आणि लग्न नाकारणे यांसारख्या अत्यंत दुर्दैवी मानसिकतेचे दर्शन घडवणारी एक खळबळजनक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथून समोर आली.
woman dies by suicide after repeated marriage rejection
woman dies by suicide after repeated marriage rejectionDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar Crime News: भारतात 21व्या शतकातही रंगावरुन टोमणे मारणे आणि लग्न नाकारणे यांसारख्या अत्यंत दुर्दैवी मानसिकतेचे दर्शन घडवणारी एक खळबळजनक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथून समोर आली. केवळ सावळा रंग असल्यामुळे लग्नाचे तब्बल 10 प्रस्ताव नाकारले गेल्याच्या नैराश्यातून एका तरुणीने गळफास घेवून जीवन संपवले. 11व्यांदा तिला पाहायला पाहुणे येणार होते, परंतु पुन्हा मिळणाऱ्या नकाराच्या भीतीने आणि सततच्या मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरंदपूर गावात घडली असून, पीतांबर कुमार यांची मुलगी अंशू कुमारी हिने आपले जीवन संपवले.

गेल्या तीन वर्षांपासून अंशूच्या कुटुंबीयांकडून तिच्यासाठी योग्य मुलाचा शोध सुरु होता. या काळात लग्नाचे 10 हून अधिक प्रस्ताव आले आणि मुलाकडचे लोक तिला पाहण्यासाठीही आले, पण केवळ सावळा रंग असल्याच्या कारणावरुन प्रत्येक वेळी तिचे लग्न मोडले. या सततच्या नकारांमुळे ती प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होती.

woman dies by suicide after repeated marriage rejection
Bihar Crime: 14 वर्षाच्या मुलासोबत विवाहित महिलेचा 'इश्क', कुटुंबियांनी पकडले अन्...

आपल्या सावळ्या रंगामुळे आपले लग्न कधीच होणार नाही, अशी भावना तिच्या मनात घर करुन बसली होती. त्यानंतर, बुधवारी पुन्हा एकदा तिला लग्नासाठी पाहण्यासाठी मुलाकडची मंडळी येणार होती. यामुळे अंशू प्रचंड घाबरली होती आणि तिला यावेळीही पूर्वीसारखाच अपमान सहन करावा लागेल अशी भीती वाटत होती.

woman dies by suicide after repeated marriage rejection
Bihar Crime: इन्स्टाग्रामवरील प्रेमाची किंमत तब्बल 50 लाख; प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचे अपहरण

याच मानसिक तणावातून मंगळवारी रात्री अंशू कोणाशीही न बोलता आणि जेवण न करताच आपल्या खोलीत झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी खूप वेळ झाला तरी खोलीचा दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, अंशूने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघड झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गायघाट पोलीस ठाण्याचे एसडीपीओ अलय वत्स आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

woman dies by suicide after repeated marriage rejection
Bihar Crime: बिहारमध्ये दोन न्यायाधीशांवर हल्ला, शिवीगाळ करत गळा दाबण्याचा केला प्रयत्न

पोलिसांनी (Police) पंचनामा करुन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर तपास करत असून, या घटनेने समाजातील जुनाट मानसिकतेवर पुन्हा एकदा तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com