पश्चिम बंगालमध्ये BJPकार्यकर्त्याची हत्या! कुटुंबीयांनी केला TMCवर आरोप

भाजपचे स्थानिक आमदार रवींद्रनाथ मैती यांनी याबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे.
Murder of BJP workers in West Bengal allegations against TMC
Murder of BJP workers in West Bengal allegations against TMCDainik Gomantak

कंठी: पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) पुन्हा एकदा भाजप (BJP) कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व मिदनापूरमधील मध्य रस्त्यावर एका भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. संभू मैती असे या मृताचे नाव आहे. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भागबनपूर परिसरात त्याचा मृतदेह आढळला. सकाळी काही लोकांनी मृताला नदीजवळ जखमी अवस्थेत पाहिले, त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ व्यक्तीला रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. भाजपचे स्थानिक आमदार रवींद्रनाथ मैती यांनी याबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) जबाबदार धरले आहे.

Murder of BJP workers in West Bengal allegations against TMC
भाजपचे खासदार तेजस्‍वी सूर्या यांचे TMC वर 'सनसनाटी' आरोप..

त्याचवेळी आता कुटुंबीयांनी टीएमसी कार्यकर्त्यांवर शंभू मैती यांच्या हत्येचा आरोप केला आहे. मात्र, टीएमसीने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे भाजपने आरोप केला आहे की शंभू मैती यांना टीएमसीच्या काही कार्यकर्त्यांनी आधी रस्त्यावर बेदम मारहाण केली, त्यानंतर त्यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली.

भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, काल रात्री दहाच्या सुमारास त्यांना रस्त्यावरून उचलण्यात आले. यानंतर त्याला नदीकाठी बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना बेदम मारहाण करून नंटू कॉलेजजवळ टाकले. आमचे स्थानिक कर्मचारी भीतीमुळे परिसरात जाऊ शकले नाहीत. तेवढ्यात मला फोन आला. आणि शंभू गेल्याची बातमी समजली. त्यानंतर भगवानपूर पोलिस स्टेशनच्या ओसींना फोन केला. पोलिसांनी फौजफाटा पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर त्याला रुग्णालयात आणले असता मृत घोषीत करण्यात आले.

Murder of BJP workers in West Bengal allegations against TMC
राज्यपाल मलिक पुन्हा कडाडले, 'मी पद सोडू शकतो, पण शेतकऱ्यांचे नुकसान बघणार नाही"

ऑक्टोबर महिन्यातच पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहारमध्ये, भाजपचे युवा नेते मिथुन घोष यांची राजग्राम गावात त्यांच्या घरासमोर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांचीी हत्या केली होती. या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या समाजकंटकांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. टीएमसीने मात्र हा आरोप तेव्हाही फेटाळून लावला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com