Canada: सोशल मीडियावर एखाद्याच्या मेसेजला उत्तर देण्यासाठी तो वाचावा, काय आहे पाहावा अन् त्यानंतर उत्तर द्यावे. त्याचबरोबर इमोजीचा वापर काळजीपूर्वक करावा. कारण त्यामधून अनेकवेळा चुकीचा संदेश जाण्याचा धोका असतो. यातून अनेक कायदेशीर पेचप्रसंगही उद्भवू शकतात किंवा अनेकदा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो.
आता सोशल मीडियाचा वापर करताना दुर्लक्ष केल्याचा चांगलाच फटका कॅनडातील एक शेतकऱ्याला बसला असून त्याने मेसेज न वाचताच उत्तर दिल्याने 5, 002,000 एवढ्या रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. 2021 मध्ये धान्य खरेदीदार केंट मिक्लेबरो खरेदी करु पाहत असलेला 86 टन अंबाडी वितरीत करण्यात अपयशी ठरल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले.
दुसरीकडे मिक्लेबरो म्हणाले की, मी मिस्टर अॅक्टरशी त्यांच्या अंबाडीच्या खरेदीबाबत फोनवरुन चर्चा केली होती. त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये धान्य खरेदी करण्याचा माझा विचार होता.
त्यानंतर त्याने अॅक्टरशी कराराच्या मसुद्याचा मजकूर पाठवत, "कृपया फ्लॅक्स कॉन्ट्रॅक्टची पुष्टी करा" असे लिहले होते. त्यावर अॅक्टर यांनी "थम्ब्स-अप" इमोजीचा वापर करत याला होकार दर्शवला, परंतु ते ठरवलेल्या तारखेला अंबाडीचे वितरण करु शकले नाहीत.
मिक्लेबरो यांनी सांगितले की, माझे अॅक्टर यांच्याशी अनेक वर्षापासूनचे व्यवसायिक संबंध आहेत. यापूर्वीही त्यांनी माझ्याशी मेसेजद्वारे पाठवलेल्या करारातून धान्याचा पुरवठा केला होता, त्यामुळे या प्रकारणातही त्यांनी पाठवलेल्या इमोजीमुळे हा करार स्वीकारला असल्याचा माझा समज झाला.
यावर उत्तर देताना अॅक्टर म्हणाले की, मी पाठवलेली थम्ब्स-अप इमोजी फक्त फ्लॅक्स कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची पुष्टी करणारी होती. याचा अर्थ असा नाही की, करारातील अटींशी मी सहमत आहे. या वर्षाच्या जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या किंग्ज खंडपीठाच्या महत्त्वपूर्ण निर्णयात, न्यायमूर्ती टिमोथी कीनी यांनी मिक्लेबरोची बाजू घेतली.
दुसरीकडे, त्यांनी इमोजीच्या Dictionary.com. चा आधार घेत म्हटले की, थम्ब्स अप इमोजी डिजिटल स्वाक्षरीच्या संमतीसाठी मान्यता किंवा प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाते. मला माहिती नाही की, ते किती अधिकृत आहे, परंतु हे माझ्या दैनंदिन वापरातील माझ्या आकलनाशी सुसंगत आहे.
ते पुढे म्हणाले की, स्वाक्षरी ही एखाद्याच्या ओळखीची पुष्टी करण्याचा योग्य पर्याय आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला कराराची पुष्टी करण्यासाठी आधुनिक पद्धत म्हणून इमोजी वापरण्यापासून रोखत नाही आणि इमोजी डिजिटल स्वाक्षरी म्हणून वापरली जाऊ शकते.
न्यायमूर्ती कीनी यांनी पुढे सांगितले की, न्यायालयाने मान्य केले की, थंब्स-अप इमोजी हे करारावर 'स्वाक्षरी' करण्याचे एक आधुनिक माध्यम आहे. परंतु तरीही या परिस्थितीत 'स्वाक्षरी'चे दोन उद्देश सांगण्याचा हा एक वैध मार्ग होता. ते पुढे म्हणाले की, स्वाक्षरी करणार्याची ओळख पटवण्यासाठी, अॅक्टर यांचा फोन नंबर तपासला जाऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.