जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, सुरक्षा दलांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरले

दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये ही चकमक सुरू झाली
Jammu & Kashmir
Jammu & KashmirDainik Gomantak

Shopian Encounter Update: शोपियांच्या हेफ शिरमलमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे, सूत्रांनुसार, 2-3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दल शोध मोहिमेसाठी परिसरात पोहोचले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर चकमक सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चकमक सुरू असून दोन्ही बाजूंनी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून जवळपास 150 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच 11 प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे 500 ते 700 इतर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दल सीमेपलीकडून होणाऱ्या चकमकीला सातत्याने हाणून पाडत आहेत.

Jammu & Kashmir
अमरनाथ यात्रेत अढथळा आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न! सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान

लष्कराच्या अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की यावर्षी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न यशस्वी झाला नाही. अधिकाऱ्याने असेही सांगितले की दहशतवादी घुसखोरीसाठी आधीच अवलंबलेल्या मार्गांव्यतिरिक्त इतर मार्ग शोधत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com