Gujarat Riots: समाजसेविका तीस्ता सीतलवाड यांच्यावर ATS मोठी कारवाई

सीतलवाड यांनी 2002 च्या गुजरात दंगलीबाबत पोलिसांना निराधार माहिती दिल्याचा आरोप केला होता.
Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in Mumbai
Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in MumbaiANI
Published on
Updated on

गुजरात दंगलीप्रकरणी (Gujarat Riots) गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड (Teesta Setalvad) यांना मुंबईतून ताब्यात घेतले आहे. एटीएसचे पथक सीतलवाड यांच्या मुंबईतील घरी पोहोचले आणि त्यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नेले, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे. एटीएसच्या या कारवाईपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सीतलवाड यांनी 2002 च्या गुजरात दंगलीबाबत पोलिसांना निराधार माहिती दिल्याचा आरोप केला होता.

Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in Mumbai
अमित शहा म्हणाले, 'SIT समोर नरेंद्र मोदी नाटक करत गेले नव्हते...'

तीस्ता सीतलवाड यांच्याविरोधात हे पाऊल त्यांच्या एनजीओविरोधातील खटल्याच्या संदर्भात उचलण्यात आल्याचे सांगतिले जात आहे. गुजरात दंगलीशी संबंधित झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली असताना सीतलवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते. यासोबतच मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिटही मिळाली आहे.

Gujarat ATS detained and took activist Teesta Setalvad to Santacruz police station in Mumbai
Gujarat Violence 2002: PM मोदींना क्लीन चिट, वाचा सविस्तर प्रकरण

2006 मध्ये झाकियाने पीएम मोदींविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज केला होता. 2007 मध्ये गुजरात हायकोर्टाने तो न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवला. दुसरीकडे, 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दंगलीशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी माजी सीबीआय संचालक आरके राघवन यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली. तीस्ता सीतलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com