ONGC Chopper Accident: ओएनजीसीचे तीन आणि अन्य एक अशा चौघांचा मृत्यू

ONGC च्या रिंगवर उतरताना घडला अपघात
ONGC Chopper Accident
ONGC Chopper AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या हंस हेलिकॉप्टरचा मुंबई येथे अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ओएनजीसीचे तीन आणि अन्य एक अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ओएनजीसी कर्मचाऱ्यांनी याबाबत दिली माहिती. मात्र या अपघाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (mumbai ONGC chopper accident four die )

ONGC Chopper Accident
कोण आहेत तिस्ता सेटलवाड?, पद्मश्री परत घेण्याची केली जायेत मागणी

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई किनारपट्टीपासून 50 मैल अंतरावर अरबी समुद्रात ONGC कंपनीच्या रिंगवर उतरताना हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर फ्लोटर्सच्या मदतीने हेलिकॉप्टर काही काळ बुडण्यापासून वाचले, ज्यामुळे सर्व नऊ जणांना बाहेर काढण्यात मदत झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अपघातानंतर थोड्याच वेळात नौदलाच्या हेलिकॉप्टरने अपघातग्रस्तांना मुंबईतील रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ONGC Chopper Accident
पहिल्या पत्नीची हत्या करून दुसऱ्या पत्नीसह पती फरार

मुंबईपासून 60 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या ONGC हेलिकॉप्टरमधील प्रवासी आणि क्रू यांना वाचवण्यासाठी नौदलाने सीकिंग आणि ALH प्रकारची हेलिकॉप्टर आणि भारतीय नौदलाचे जहाज तेग तैनात केले. यासाठी तटरक्षक दलाने एक जहाजही या कार्यासाठी पाठवले आहे. तसेच मुंबईहून एक जहाजही मागवण्यात आले आणि ते बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com