पहिल्या पत्नीची हत्या करून दुसऱ्या पत्नीसह पती फरार

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे घडली घटना; गळा दाबून खून केल्याचा संशय
CRIME NEWS
CRIME NEWS Dainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील खिद्रापूर गावात 25 वर्षांपूर्वी संतोष कुमार आणि सीलम देवी यांचे लग्न झाले होते. यानंतर मूलबाळ नसल्याने या दोघांमध्ये वारंवार भांडण होत असत यातच दीड वर्षापूर्वी संतोष कुमारने दुसरं लग्न करून गायत्रीपुरममध्ये दुसऱ्या पत्नीसोबत दुसऱ्या घरात राहाण्यास सुरुवात केली. यावरुन पहिली पत्नी आण दुसरी पत्नी यांच्यात वारंवार भांडण होत असे. या पार्श्वभूमीवर हा खुन संतोष कुमारने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Husband absconded with second wife after killing first wife )

CRIME NEWS
कोण आहेत तिस्ता सेटलवाड?, पद्मश्री परत घेण्याची केली जायेत मागणी

मिळालेल्या माहितीनुसार दुसरं लग्न केल्यानंतर दोन्ही पत्नींमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सीलम देवी यांची बहीण काजल यांनी आपल्या बहिणीला भेटावं म्हणून सीलम देवीच्या घरी आली असता हा प्रकार घडल्याचं समोर आले आहे.

काजल यांनी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आली असता दरवाजा उघडल्यानंतर बहीण मृत अवस्थेत पडली असल्याचं दिसलं यावेळी त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. मृताच्या लहान बहिणीने सांगितले की, पुन्हा लग्न झाल्यानंतर तिचा नवरा आमच्या बहिणीशी याच गोष्टीवरून दररोज भांडण करत असे. यामुळे त्यांनी आमच्या बहिणीचा गळा दाबून खून केला आहे.

CRIME NEWS
कटप्पाने बाहुबलीला का मारले? ठाकरे- शिंदेंचे मुंबई ते गुवाहाटीपर्यंत पोस्टर वॉर

या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. सिटी कोतवाल संजय मौर्य यांनी सांगितले की, आरोपी पती संतोष कुमार त्याच्या दुसऱ्या पत्नीसह फरार आहे. प्रथमदर्शनी महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com