VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Mumbai Indians Maharashtra Forts Video: देशभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रकाश, फटाके, गोडधोड पदार्थ आणि सजावट यांच्याने वातावरण भारले आहे.
Mumbai Indians Maharashtra Forts Video
Mumbai Indians Maharashtra Forts VideoDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: देशभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रकाश, फटाके, गोडधोड पदार्थ आणि सजावट यांच्याने वातावरण भारले आहे. पण या सणाचं एक वेगळं आकर्षण म्हणजे मुलांनी बनवलेले मातीचे किल्ले. या पारंपरिक उपक्रमातून मुलं फक्त खेळत नाहीत, तर मराठी इतिहास आणि संस्कृतीशी जोडली जातात.

याच पार्श्वभूमीवर आयपीएलमधील लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्स ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर आधारित एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत चिमुकल्या हातांनी माती, वाळू आणि छोट्या खेळण्यांच्या सहाय्याने बनवलेले अप्रतिम किल्ले दाखवले आहेत. रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांच्या लघुरूप प्रतिकृती पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. प्रत्येक किल्ल्यातून शिवकालीन वैभव आणि मराठी शौर्याची झलक दिसून येते.

Mumbai Indians Maharashtra Forts Video
Ronaldo Goa Visit: रोनाल्डो गोव्यात फुटबॉल खेळणार? प्रशासन सज्ज; 22 ऑक्टोबर रोजी होणार सामना

मुंबई इंडियन्सने या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, महाराष्ट्रातील दिवाळीचे किल्ले ” या काही शब्दांतच संघाने मराठी परंपरेला आणि बालकलाकारांच्या कल्पकतेला दिलेला सलाम स्पष्ट झाला आहे.

काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला. हजारो चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सद्वारे या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. अनेक युजर्सनी लिहिलं, “मुंबई इंडियन्सनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या संस्कृतीला सलाम केला आहे.” तर काहींनी म्हटलं, “अशा पोस्टमुळे नव्या पिढीला आपल्या इतिहासाची जाणीव राहते आणि वारसा जपण्याची प्रेरणा मिळते.”

Mumbai Indians Maharashtra Forts Video
Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

दिवाळीच्या या शुभ सणात मुंबई इंडियन्सच्या या सुंदर उपक्रमाने संस्कृती, सर्जनशीलता आणि खेळ या तिन्हींचा संगम साधत चाहत्यांच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हा व्हिडिओ केवळ एक सोशल मीडिया पोस्ट नसून, तो महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान आणि बालसृजनाचा उत्सव ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com