मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलली, निकाल 4 डिसेंबरला लागणार!

Mizoram Assembly Elections: निवडणूक आयोगाने शुक्रवारी मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलून 4 डिसेंबर केली आहे.
Mizoram Assembly Elections
Mizoram Assembly ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

Mizoram Assembly Elections: निवडणूक आयोगाने शुक्रवारी मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलून 4 डिसेंबर केली आहे. यापूर्वी रविवारी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. निवडणूक आयोगाने सांगितले की, तारीख बदलण्याची मागणी लक्षात घेऊन आता 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मिझोरममध्ये 'एनजीओ कोऑर्डिनेशन कमेटी' (एनजीओसीसी) च्या सदस्यांनी शुक्रवारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर 3 डिसेंबर रोजी प्रस्तावित केलेल्या मतमोजणीच्या तारखेत बदल केल्याच्या विरोधात राज्यभर निदर्शने केली. राज्याची राजधानी एझॉल आणि इतर जिल्हा मुख्यालयात निदर्शने करण्यात आली. NGOCC ही प्रभावशाली सेंट्रल यंग मिझो असोसिएशन (CYMA) आणि मिझो जिरलाई पावल (MZP) सह प्रमुख नागरी समाज संघटना आणि विद्यार्थी गटांची एक प्रमुख संस्था आहे.

Mizoram Assembly Elections
MP Assembly Election 2023: 'PM मोदींनी भारताला शक्तिशाली राष्ट्र बनवले...': केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

दुसरीकडे, एझॉलमधील राजभवनाजवळील रॅलीला संबोधित करताना, एनजीओसीसीचे अध्यक्ष लालमचुआना यांनी राजकीय पक्ष, चर्च आणि स्वयंसेवी संस्थांनी मतमोजणी तारीख बदलण्यासाठी वारंवार आवाहन करुनही निवडणूक आयोग या मुद्द्यावर मौन बाळगल्याचा आरोप केला. लालमचुआना म्हणाले की, मतमोजणीची तारीख रविवारी येते, जो ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस आहे. ते पुढे म्हणाले की, मिझोरम हे ख्रिश्चन बहुल राज्य आहे. NGOCC ने अलीकडेच एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. हे दुर्दैव आहे की निवडणूक आयोगाने या मुद्द्यावर मौन बाळगले आणि आमच्या अपीलांना प्रतिसाद दिला नाही.

Mizoram Assembly Elections
Telangana Assembly Election: जाहीरनामा की कुबेराचा खजिना? लग्नावेळी नववधूंना कॉंग्रेस देणार एक तोळा सोने

दरम्यान, मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झाले. राज्यातील 8.57 लाख पात्र मतदारांपैकी 80 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले आहे. एकूण 174 उमेदवार निवडणूक लढले. राज्यातील सर्व 13 मतमोजणी केंद्र आणि 40 मतमोजणी हॉलमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल, त्यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com