MP Assembly Election 2023: 'PM मोदींनी भारताला शक्तिशाली राष्ट्र बनवले...': केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Defense Minister Rajnath Singh: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी ही टीका केली.
Defense Minister Rajnath Singh
Defense Minister Rajnath SinghDainik Gomantak
Published on
Updated on

MP Assembly Election 2023: गेल्या साडेनऊ वर्षांत भारताविषयीची धारणा बदलली असून, तो आता कमकुवत देश मानला जात नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. या आठवड्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी ही टिप्पणी केली.

ते म्हणाले की, पूर्वी भारताविषयीचा समज होता की हा एक कमकुवत देश आहे, गरीबांचा देश आहे, परंतु गेल्या साडेनऊ वर्षांत हे चित्र बदलले आहे. आज भारताला कमकुवत देश मानले जात नाही.

राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला

सिंह पुढे म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे गांभीर्याने ऐकले जात नव्हते, परंतु आज जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय मंचांवर बोलतो तेव्हा जगातील इतर देश लक्षपूर्वक ऐकतात. भारताचा लौकिक जगभरात वाढला आहे.

इतकंच नाही तर आधी भारत (India) अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात 11व्या स्थानावर होता, मात्र आज भारताने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.' त्यांनी पुढे काँग्रेसवर निशाणा साधला आणि विचारले की, काँग्रेसने आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत काय केले?

Defense Minister Rajnath Singh
MP Assembly Election: भाजपकडून पहिला डाव! निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच तिकीट वाटप सुरू

सिंह पुढे असेही म्हणाले की, 'पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा खूप उंचावली. त्यांनी भारताला आर्थिक दृष्टीकोनातून इतकं शक्तिशाली बनवलं की आज तो 11व्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.' मंगळवारी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शाजापूर इथे एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'भारतीय जनता पक्षाचे वादळ मध्य प्रदेशातून काँग्रेसला उखडून टाकेल.'

Defense Minister Rajnath Singh
MP Assembly Election: कर्नाटक विजयानंतर मिशन MP, 150 जागा जिंकणार कॉंग्रेस; राहुल गांधींचा मोठा दावा

गेल्या काही दिवसांत मी मध्य प्रदेशातील विविध भागात लोकांना भेटलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, असे पीएम मोदी म्हणाले होते. भाजपवर दाखवण्यात आलेला विश्वास आश्चर्यकारक आहे.

दिल्लीत बसून निवडणुकीचे गणित मांडणाऱ्यांना त्यांचे आकलन करता आले नाही, असेही ते पुढे म्हणाले होते. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com