Telangana Assembly Election: जाहीरनामा की कुबेराचा खजिना? लग्नावेळी नववधूंना कॉंग्रेस देणार एक तोळा सोने

Telangana Assembly Election 2023: जर आपण तेलंगणा विधानसभा निवडणुका 2018 च्या निकालांवर नजर टाकली तर, BRS पक्षाने 87 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 19 जागा मिळाल्या होत्या.
Congress promised brides 10 gram (1 tola) of gold and Rs 1 lakh in cash in Manifesto for Telangana assembly election campaign.
Congress promised brides 10 gram (1 tola) of gold and Rs 1 lakh in cash in Manifesto for Telangana assembly election campaign.Dainik Gomantak

Congress promised brides 10 gram (1 tola) of gold and Rs 1 lakh in cash in Manifesto for Telangana assembly election campaign:

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजकीय पक्षांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचवेळी बीआरएसने आपला जाहीरनामाही जाहीर केला.

आता काँग्रेसही आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. अशात काँग्रेस पक्षाने आपल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लग्नाच्या वेळी पात्र वधूंना 1 तोळा सोने, 1 लाख रुपये रोख आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट अशी आश्वासने देऊ शकते, असे मानले जात आहे.

टीपीसीसी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डी श्रीधर बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोख 1 लाख रुपये रकमेव्यतिरिक्त, पक्षाच्या 'महालक्ष्मी' हमी अंतर्गत वधूंना एक तोळे सोने दिले जाईल.

सध्या तेलंगणामध्ये बीआरएस सरकारच्या कल्याणा लक्ष्मी आणि शादी मुबारक योजना लागू आहेत. या अंतर्गत, तेलंगणातील रहिवासी असलेल्या आणि ज्यांचे पालकांचे उत्पन्न प्रति वर्ष 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा वधूंना लग्नाच्या वेळी 1,00,116 रुपयांची एक वेळची आर्थिक मदत दिली जाते.

श्रीधर बाबू यांनी सांगितले की, राज्यातील पात्र वधूंना एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोने दिले जाईल. त्याची किंमत सुमारे 50 ते 55 हजार असेल.

जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेटचाही समावेश करण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे जाहीरनामा समितीच्या सदस्याने सांगितले.

बीआरएसचे प्रवक्ते श्रावण दासोजू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकार निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करू शकत नाही, मग इथली आश्वासने कशी पूर्ण करणार.

Congress promised brides 10 gram (1 tola) of gold and Rs 1 lakh in cash in Manifesto for Telangana assembly election campaign.
Darwin's Theory: डार्विन, आइनस्टाईनच्या सिद्धांताविरोधात PIL, सुप्रीम कोर्टाने याचिकार्त्याला हाकलले

तेलंगणा येथे विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

तेलंगणा राज्य सरकारचा सध्याचा कार्यकाळ जानेवारी 2024 मध्ये संपत आहे. डिसेंबरमध्येच राज्यात निवडणुका घेऊन तेलंगणा निवडणुकीचे निकाल जाहीर करणे आवश्यक आहे.

सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव आहेत. तर विधानसभेत बीआरएसचा विरोधी पक्ष काँग्रेस आहे. तेलंगणात तीन प्रमुख पक्षांमध्ये लढत असल्याचे सांगितले जात आहे. ही लढत बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे.

Congress promised brides 10 gram (1 tola) of gold and Rs 1 lakh in cash in Manifesto for Telangana assembly election campaign.
SC on Same Sex Marriage: समलिंगी विवाहाच्या बाजूने SC चा मोठा निर्णय, विवाहांची नोंदणी करण्याचे सरकारला आदेश

जर आपण तेलंगणा विधानसभा निवडणुका 2018 च्या निकालांवर नजर टाकली तर, BRS पक्षाने 87 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 19 जागा मिळाल्या होत्या.

तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला ७ जागा मिळाल्या होत्या. तेलंगणात भाजपला फक्त 1 विधानसभेची जागा मिळाली होती. तर तेलुगु देसम पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com