चीनविरुद्ध भारतीय सैन्याचे ऑपरेशन स्नो लेपर्ड सुरूच- क.लेफ्टनंट जनरल वाय के जोशी

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैनिक सतर्क आणि सज्ज.
India - China
India - ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांनी सांगितले की 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' अजूनही सुरू आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैनिक सतर्क आणि सज्ज आहेत. ते म्हणाले की चर्चेद्वारे लडाखमधील सैन्य आणि शस्त्रे मागे घेण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

India - China
आगामी काळात जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक होणार: अमित शहा

जनरल ऑफिसर-कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) वाय के जोशी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नॉर्दन कमांडच्या मुख्यालयात समारंभाला संबोधित केले. कमांड लाइनमधील 'असामान्य' आणि 'उत्कृष्ट' कामगिरीबद्दल त्यांनी 40 युनिट्सना GOC-इन-C कम्पेंडेशन आणि 26 युनिट्सना GOC-in-C चे ‘प्रशस्ति प्रमाणपत्र’ दिले. तर ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन नॉर्दर्न बॉर्डर्स (Border)आणि कमांडमधील इतर मिशनमधील युनिट्सच्या कामगिरीबद्दल GOC-इन-C चे प्रशस्तीपत्र देण्यात आले.

काय आहे ऑपरेशन स्नो लेपर्ड

चीनने पूर्व लडाखमध्ये परतण्यास आणि पूर्वस्थिती पूर्ववत करण्यास नकार दिल्यानंतर स्नो लेपर्ड ही मोहीम सुरू करण्यात आली.आपल्या भाषणात, आर्मी कमांडर म्हणाले की, "जम्मू, काश्मीर (Jammu Kashmir) आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचे महत्त्व सर्वश्रुत आहे आणि आम्ही नियंत्रण रेषा (एलओसी), वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी), वास्तविक ग्राउंड पोझिशन (एजीपीएल) किंवा आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) या प्रदेशाच्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्ण समर्पणाने आमची भूमिका बजावत आहे. आम्ही आमचे पूर्ण वर्चस्व राखत आहोत.

India - China
जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूका होणार ?

बर्फाच्छादित शिखरांमध्ये सैनिक सतर्क

नॉर्दर्न कमांडच्या शूर जवानांनी शत्रूचे आक्रमक मनसुबे उधळून लावले. चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील (Ladakh)घडामोडींचा संदर्भ देताना ते म्हणाले की, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सोबतच्या संघर्षाच्या ठिकाणांहून माघार घेण्याचे काम अनेक भागात शांततेत पूर्ण झाले आहे आणि इतर भागांतून माघार घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बर्फाच्छादित शिखरांमध्ये सैनिक पूर्ण सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com