कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक कधी होणार यावर सर्वांचेच लक्ष लागलेल आहे.
पण आता मात्र जम्मू-काश्मीरचे राज्य पुनर्रचना झाल्यानंतरच विधानसभा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी गुपकार संघटनेकडून करण्यात अली आहे.
जम्मू काश्मीरला मुख्य राज्याचा दर्जा देऊन राज्य पुनर्रचना करण्यासाठी भाजपने हा विषय संसदेच्या पाटलावरती घ्यावा. आणि नंतरच निवडणुकीचा विचार करावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या निकालावर सोमवारी पीपल्स अलायन्स फॉर गोपकर(गुपकार) ने निराशा व्यक्त केली आहे. राजकीय आणि इतर कैद्यांच्या सुटकेच्या बाबतीत पुरेसे आत्मविश्वास वाढवण्याच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचेस संघटनेने म्हटले आहे.
राजकीय आणि इतर कैद्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे आणि कथित दडपणाचे वातावरण संपविण्यासाठी ठोस पावले उचलणे यासारख्या योजना निर्माण उपाययोजना याबद्दल दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा न झाल्याने पीएजीडीच्या सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशनचे प्रवक्ते आणि सीपीआयएमचे नेते मोहम्मद युसुफ तारीगामी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी संध्याकाळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी युतीची बैठक झाली.या बैठकीला युतीचे उपाध्यक्ष आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, सीपीआयएमचे नेते मोहम्मद युसुफ तारीगामी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते हसनैन मसूदी, पीपल्स मुव्हमेंटचे प्रमुख जावेद मुस्तफा मीर आणि अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुजफ्फर अहमद शाह उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.