राम मंदिरातील पुजारी भरतीसाठी मेरिट लिस्ट जाहीर, अयोध्येत मुलाखतीही झाल्या सुरू

Ram Mandir priest recruitment Ayodhya: निवड झालेल्या उमदवारांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक उमेदवाराला 2,000 रुपये मासिक मानधनही दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
Ram Mandir priest recruitment
Ram Mandir priest recruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

Merit list announced for Ram Mandir priest recruitment, interviews also started in Ayodhya:

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात पुजाऱ्यांच्या भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून, त्यासाठी मुलाखतीही सुरू झाल्या आहेत.

यासाठी एकूण तीन हजार जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील गुणवत्ता यादीच्या आधारे 225 जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.

मुलाखतीत निवड झालेल्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर गरजेनुसार त्यांची नियुक्ती केली जाईल.

शनिवारपासून सुरू झाल्या उमेदवारांच्या मुलाखती

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र द्वारे चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर होती. आता शनिवारपासून दोन दिवसीय मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

तीर्थक्षेत्र रामकोट येथील निवासी कार्यालयात झालेल्या या मुलाखतीसाठी पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या २२५ उमेदवारांना मुलाखतीसाठी एक दिवस अगोदर त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवण्यात आला होता.

60 हून अधिक उमेदवार ठरलेल्या वेळी मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचले. या मुलाखतीची वेळ शनिवारी दुपारी एक वाजता निश्चित करण्यात आली होती.

येथे पोहोचलेल्या उमेदवारांना प्रथम भरण्यासाठी एक फॉर्म दिला जातो. उमेदवारांनी फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर त्यांची यादी तयार करण्यात आली आणि त्यानंतर मुलाखतीला सुरुवात झाली.

Ram Mandir priest recruitment
CWC Final 2023: ग्राउंडवर घुसत कोहलीला पकडणाऱ्या ऑस्ट्रेलियन तरुणाला खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून 10 हजार डॉलर्सचे बक्षीस

तीन हजार उमेदवारांनी केले होते अर्ज

या मुलाखतीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देव गिरी एक दिवस आधी येथे पोहोचले होते. त्यानंतर अर्जदारांची गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या मोबाईलवर मुलाखतीसाठी संदेश पाठविण्यात आला.

यासाठी तीन हजार अर्जदारांनी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 225 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.

Ram Mandir priest recruitment
Prayagraj-Goa Flight: प्रयागराज ते गोवा थेट विमानसेवा सुरू होणार? विमान कंपन्या करणार सर्व्हे

निवड झालेल्या उमेदवारांचे 6 महिने प्रशिक्षण

या मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमदवारांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक उमेदवाराला 2,000 रुपये मासिक मानधनही दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

या निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती आवश्यकतेनुसार होईल. परंतु सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाईल.

उमेदवारांच्या मुलाखती घेणाऱ्यांमध्ये वृंदावनचे प्रसिद्ध कथाकार डॉ. जयकांत मिश्रा, हनुमत निवासचे महंत आचार्य मिथिलेश नंदिनी शरण आणि रामकुंज कथा मंडपाचे उत्तराधिकारी महंत सत्यनारायण दास यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com