कुतुबमिनार नामकरण मागणीवर मेहबूबा मुफ्तींचं मोठं विधान

''50 टक्के परदेशी पर्यटक भारतात मुघल वास्तुकला पाहण्यास येतात''
Mehbuba Mufti
Mehbuba MuftiDainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात सध्या विविध धार्मिक स्थळांवरून वादाचं वातावरण आहे. यातच एका हिंदुत्ववादी संघटनेने कुतुबमिनार हा विष्णू स्तंभ असल्याचा दावा केला आहे. यावरुन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ( Mehbooba Mufti's big statement on demand for naming Qutub Minar )

मुफ्ती यांच्या दाव्याप्रमाणे ‘50 टक्के परदेशी पर्यटक भारतात केवळ मुघल वास्तुकला पाहण्यासाठी येत असतात. तर उर्वरित 50 टक्के पर्यटक काश्मीर पाहण्यासाठी येत असतात. पण भाजपाने ही दोन्ही ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत’, असं त्या म्हणाल्या. दिल्लीतील कुतुबमिनारबाहेर एका हिंदुत्ववादी गटांनं आंदोलन करून कतुबमिनारचं नाव बदलून विष्णूस्तंभ ठेवावं अशी मागणी केली. त्यानंतर मुफ्ती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरकारने काश्मिरींवर दबाव आणला असून हिंदू विरुद्ध मुस्लीम असा वाद निर्माण केला जात आहे. तसेच इतर मुद्द्यांना दुर्लक्षित केलं जात आहे,” असंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. त्यामूळे मुफ्ती यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात धार्मिक वादांऐवजी खुप महत्त्वाचे मुद्दे आहेत. ज्याच्याकडे मोदी सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करते आहे.

Mehbuba Mufti
ज्ञानवापी मशीदमध्ये शिवलिंग मिळाल्याचा दावा, न्यायालयाने दिले आदेश

''हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचं मंदिर बनवून दाखवा''

देशातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर ताजमहालबाबत वाद सुरु होता. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी उडी घेत ताजमहालबाबत भाजपला आव्हान देत “तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचं मंदिर बनवून दाखवा. मग बघू किती लोकं हा देश बघण्यासाठी इथे येतात.” लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला जात असल्याचे आरोपही मेहबूबा मुफ्ती यांनी केला होता.

Mehbuba Mufti
Weather Update: मॉन्सूनने दिली दस्तक, कडक उन्हात लवकरच पडणार पाऊस

“मुघलांच्या काळात ताजमहाल, मशिदी, किल्ले बांधले गेलेत, त्या त्यांना खराब करायच्या आहेत. म्हणून त्यांच्या मागे पडून आहेत. यातून काहीच मिळणार नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखे काहीच नाही, असा टोला पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. यावर चर्चा करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com