Weather Update: मॉन्सूनने दिली दस्तक, कडक उन्हात लवकरच पडणार पाऊस

दिल्ली-एनसीआर, पंजाब-हरियाणा, राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेशसह देशातील बहुतांश भागात सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली-एनसीआर, पंजाब-हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशसह देशातील बहुतांश भागात सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. रविवारी दिल्लीतील तापमान 49 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, मात्र आकाशातून बरसणार्‍या अंगाराच्या पार्श्‍वभूमीवर मॉन्सूनने वेळेआधीच दणका दिल्याची दिलासादायक बातमी आहे. (The southwest monsoon has entered the Andaman and Nicobar Islands)

दरम्यान, नैऋत्य मॉन्सूनने सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला असून, चार महिन्यांच्या पावसाच्या हंगामाची सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ही आनंदाची बातमी दिली आहे. हवामान खात्याने सांगितले की, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लगतच्या भागात नैऋत्य वाऱ्यांचा जोर वाढल्याने पाऊस पडत आहे.

Weather Update
Maharashtra Weather Updates: कोकण किनारपट्टीसह 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

हवामान खात्याने म्हटले आहे की, 'नैऋत्य मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, संपूर्ण अंदमान बेटांवर आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील 2-3 दिवसांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. लक्षद्वीप आणि उत्तर तामिळनाडूच्या (Tamil Nadu) किनारपट्टीवरील चक्रीवादळामुळे, पुढील पाच दिवसांत केरळ (Kerala), किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.'

Weather Update
Weather Update: मॉन्सून केरळ किनारपट्टीवर 5 दिवस आगोदरच होणार दाखल?

दुसरीकडे, येत्या दोन दिवसांत तामिळनाडूत सोमवार ते बुधवार आणि लक्षद्वीप भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की, बुधवारी कर्नाटकच्या (Karnataka) किनारपट्टी आणि दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात, हवामान खात्याने सांगितले की, नैऋत्य मॉन्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, जे 1 जूनच्या त्याच्या सामान्य सुरुवातीच्या तारखेपेक्षा पाच दिवस पुढे आहे.

विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीतील काही भागात तापमान 49 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तर गुरुग्राममध्ये 48 अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानच्या चुरुसारख्या अनेक भागातही प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com