उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) सर्वेक्षण प्रकरणात मोठा दावा करण्यात आला आहे. वकील विष्णू जैन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, मशिदीच्या आत वाळूखानामध्ये शिवलिंग सापडले. तर ही जागा सील करण्याची मागणी वकिलाने न्यायालयाकडे करण्यात आली होती, आणि ती न्यायालयाने मान्य केली आहे. ज्या मशिदीमध्ये शिवलिंग सापडले आहे त्या मशिदीच्या आतील वजुखाना सील करण्याचे आदेश न्यायालयाने वाराणसी जिल्हा प्रशासनाला दिले असून जिल्हा प्रशासनाने ते आपल्या संरक्षणात घ्यावे असेही सांगण्यात आले आहे. (Shivling found in Gyanvapi mosque court orders)
मिळालेल्या माहितीनुसार, वकील विष्णू जैन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की, ज्ञानवापी मशिदीमध्ये कथितरित्या सापडलेल्या शिवलिंगाची जागा सील करण्यात यायला हवी. याचिका स्वीकारत न्यायालयाने वाराणसी जिल्हा प्रशासनाला शिवलिंग सापडलेल्या मशिदीच्या आतील जागा सील करण्याचे आणि प्रशासनाला त्याच्या संरक्षणात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीलबंद करण्यात आलेल्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
याशिवाय जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त, सीआरपीएफ कमांडंट वाराणसी यांना सील केलेली जागा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने पुढे सांगितले आहे की, प्रशासनाने जे काही केले आहे त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी पोलिस महासंचालक, पोलिस मुख्यालय, उत्तर प्रदेश आणि मुख्य सचिव, उत्तर प्रदेश सरकार यांची असणार आहे.
नंदीच्या अगदी समोर सापडले शिवलिंग
असे सांगितले जात आहे की, नंदीच्या अगदी समोर असलेल्या ज्ञानवापी मशिदीमध्ये वजू खाण्यात शिवलिंग सापडले. वुजू खाण्यातील प्रथम पाणी काढले. शिवलिंग सापडताच आवारात हर हर महादेवचा जयघोष सुरू झाला. आणि दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने कोणत्याही प्रकारचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.