Kerala MP's Son Disrobed: केरळच्या खासदाराच्या मुलाची विमानतळावर विवस्त्र करून तपासणी

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली तक्रार; सीमा शुल्क विभागाने योग्य प्रक्रियेचे पालन न केल्याचा दावा
Kerala MP's Son Disrobed
Kerala MP's Son DisrobedDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala MP's Son Disrobed: तिरूअनंतपुरम विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या मुलाला विवस्त्र करून त्याची तपासणी घेतली, असा आरोप केरळमधील राज्यसभेचे खासदार पी. व्ही. अब्दुल वहाब यांनी केला आहे. या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, असेही वहाब यांनी सांगितले आहे.

Kerala MP's Son Disrobed
Assembly ByPoll Results: विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा; निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या

खा. वहाब हे इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाचे आहेत. त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे लेखी तक्रार करून योग्य कारवाईची मागणी केली आहे. ही घटना 1 नोव्हेंबर रोजीची असून त्या दिवशी खा. वहाब यांचे पुत्र शारजा येथील एक विवाह सोहळ्यातून परतले होते.

खा. अब्दुल वहाब यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी तपासणी प्रक्रियेचे योग्य पालन केले नाही, सीमा शुल्क अधिकारी मॅजिस्ट्रेटच्या परवानगीविना अशा प्रकारे तपासणी करू शकत नाही. कारण हे खासगीपणाच्या हक्कावरील अतिक्रमण आहे. माझ्या मुलाची रूग्णालयात तपासणी घेतली गेली आणि कुठलीही माहिती देण्यास नकार देण्यात आला. अधिकाऱ्यांना याची माहिती होती की, संबंधित व्यक्ती ही खासदाराचा मुलगा आहे, असेही वहाब यांनी म्हटले आहे.

Kerala MP's Son Disrobed
Sugar Export: यंदा देशात विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज; किती टन निर्यात होणार ते ठरले

सीमा शुल्क विभागाने म्हटले आहे की, विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले. परदेशातून सोने तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे यंत्रणेनेही अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. दरम्यान, काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार खासदार वहाब यांच्या मुलाची झडती घेतली गेलेली नसून त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com