MCD Election: MCD निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांनी कॉंग्रेसला तारलं, 'आप' ची विक्रमी आघाडी

Congress Performance: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने (आप) 15 वर्षे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेतून बाहेर केले.
Congress
Congress Dainik Gomantak

MCD Election Result 2022: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने (आप) 15 वर्षे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेतून बाहेर केले. 250 वॉर्ड असलेल्या दिल्ली महानगरपालिकेत 'आप'ला 134, भाजपला 104 आणि काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी फ्लॉप ठरली. 2017 मध्ये 31 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ 9 जागा जिंकता आल्या. मुस्लिम उमेदवारांनी निवडणुकीत काँग्रेसची (Congress) इज्जत वाचवली. काँग्रेसने जिंकलेल्या 9 वॉर्डांपैकी 7 मुस्लिम उमेदवार आहेत.

Congress
Delhi MCD Election Result: दीड दशकाच्या भाजप सत्तेला आपचा सुरूंग;दिल्ली महापालिकेत 'केजरीवाल' सरकार

कोण कुठून जिंकला

मुस्लिमबहुल अबू फजल प्रभाग 188 मधून काँग्रेसच्या उमेदवार अरीबा खान विजयी झाल्या. अरिबा खान यांनी आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार वाजिद खान यांचा पराभव केला. अरिबा या ओखलाचे माजी आमदार मोहम्मद खान यांची मुलगी आहे. तर सीलमपूरच्या प्रभाग क्रमांक 227 मधून शगुफ्ता चौधरी विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपच्या अस्मा बेगम यांचा पराभव केला. कबीर नगर वॉर्ड क्रमांक 234 मधून काँग्रेसच्या झरीफ यांनी आपच्या साजिद यांचा पराभव केला. शास्त्री पार्क वॉर्ड क्रमांक 213 मधून समीर यांनी आपच्या आदित्य चौधरी यांचा पराभव केला.

तसेच, मुस्तफाबाद येथील प्रभाग क्रमांक 243 मधून सबिला बेगम विजयी झाल्या आहेत. ब्रिजपुरी प्रभाग क्रमांक 245 मधून काँग्रेसच्या नाझिया खातून विजयी झाल्या. त्यांनी आपच्या अरफीन यांचा पराभव केला. तर आया नगरमधून शीतल विजयी झाल्या. कादीपूरमधून काँग्रेसच्या रुमा राणा यांनी आपचे सुदेश गेहलोत यांचा पराभव केला. कांझावालामध्ये काँग्रेसच्या जोगिंदर यांनी भाजपच्या वरुण सेनी यांचा पराभव केला.

Congress
Gujarat Elections: 'या' गावातील मुस्लिमांचा मतदानावर बहिष्कार! गरब्यावर दगडफेक केल्याने...

6 मुस्लिमबहुल विधानसभांच्या 23 वॉर्डांपैकी आम आदमी पार्टीला फक्त 8 वॉर्ड जिंकता आले.

  • बल्लीमारनच्या 3 प्रभागात आम आदमी पक्षाने 2 तर भाजपने एक जागा जिंकली.

  • मुस्तफाबाद विधानसभेच्या पाचही प्रभागात आम आदमी पक्षाचा पराभव झाला.

  • सीलमपूर विधानसभेच्या चारही प्रभागात आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.

  • ओखला विधानसभेच्या 5 पैकी 4 वॉर्डात 'आप'चा पराभव झाला, फक्त 1 जिंकला.

  • आम आदमी पक्षाने मटिया महल विधानसभेतील सर्व 3 प्रभाग जिंकले.

  • चांदणी चौक विधानसभेच्या तीनही प्रभागातून आम आदमी पक्ष विजयी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com