Gujarat Elections: 'या' गावातील मुस्लिमांचा मतदानावर बहिष्कार! गरब्यावर दगडफेक केल्याने...

Gujarat Assembly Elections: खेडा जिल्ह्यातील उंडेला गावात मुस्लिमांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हे तेच गाव आहे, जिथे ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी मुस्लिम तरुणांना खांबाला बांधून मारहाण केली होती.
Ballot Box
Ballot BoxDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Assembly Elections: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले. या कालावधीत सुमारे 58.68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व मतदारांनी मतदान केले. मात्र खेडा जिल्ह्यातील उंडेला गावात मुस्लिमांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हे तेच गाव आहे, जिथे ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी मुस्लिम तरुणांना खांबाला बांधून मारहाण केली होती. या तरुणांवर नवरात्रीच्या गरब्यादरम्यान दगडफेक केल्याचा आरोप होता. मतदान संपण्यापूर्वी अर्धा तास एकही मुस्लिम मतदानासाठी बाहेर पडला नाही.

समिती स्थापन करण्यात आली

पोलिसांनी (Police) मुस्लिम तरुणांना खांबाला बांधून मारहाण केली होती. यावेळी तिथे उभे असलेले लोक आनंद व्यक्त करत होते. पोलिसांनी या लोकांना जनतेची माफी मागायला सांगितल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र, या समितीचा अहवाल आजतागायत समोर आलेला नाही.

Ballot Box
Gujarat Election 2022: दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, पंतप्रधानांसह दिग्गज नेते बजावणार मतदानाचा अधिकार

3 ऑक्टोबरचा कार्यक्रम

वृत्तानुसार, 3 ऑक्टोबर रोजी एका मंदिरात गरब्यादरम्यान सुमारे 150 लोकांच्या जमावाने दगडफेक केली होती. यापैकी 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. एफआयआरनुसार, मुस्लिम (Muslim) समुदायाने गावातील मशिदीजवळ गरबा आयोजित करण्यावर आक्षेप घेतला. एफआयआरनंतर पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतल्याचे डीएसपी व्हीआर बाजपेयी यांनी सांगितले होते. या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Gujarat Day 2026 New York:
Fake ED Officer Arrested
Panaji dangerous building demolition
Bangladeshi dacoit gang arrested
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com