अमित शहांचं मोठं वक्तव्य...'मायावतींचा पक्ष संपलेला नाही'

बसपाने आपली प्रासंगिकता ही कायम ठेवली आहे. मला खात्री आहे की त्यांना मते मिळतील. किती जागा मिळतील हे मला माहीत नाही पण बसपाला मते मिळतील.
Mayawati And Amit Shah
Mayawati And Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप मायावती आणि त्यांचा पक्ष बसपा यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. खरे तर या निवडणुकीत यूपीमध्ये मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींबाबत असे बोलले जात आहे की, त्या अधिक आक्रमक होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीच याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मायावतींनी आपली प्रासंगिकता गमावलेली नाही. त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात मते मिळतील. जाटवांचे मत हे बसपाला जाणार आहे असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.(Mayawati party is not over)

Mayawati And Amit Shah
झारखंड, ओडिशा अन् बंगालमध्ये वाहणाऱ्या 'या' नदीत सापडते सोने!

टीव्ही चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले की, "बसपने आपली प्रासंगिकता ही कायम ठेवली आहे. मला खात्री आहे की त्यांना मते मिळतील. किती जागा मिळतील हे मला माहीत नाही पण बसपाला मते मिळतील." शहा म्हणाले की, या जमिनीवर मायावतींची स्वतःची पकड आहे.

"जाटव व्होट बँक मायावतींसोबत जाईल. मुस्लिम मतंही मायावतींसोबत मोठ्या प्रमाणात जातील," असेही ते म्हणाले. याचा भाजपला फायदा होईल का, असा प्रश्न शहा यांना विचारला असता ते म्हणाले की, याचा भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे मला माहीत नाही. ते सीटवर अवलंबून असते. पण, मायावतींची रेलचेल संपली हे खरे नाही.

मायावतींनी या निवडणुकीत स्वत:ला लो प्रोफाइल ठेवल्याचा दावा केला जात आहे. यावर शहा म्हणाले की, याचा अर्थ त्यांचा पाठिंबा संपला असा होत नाही. भाजपच्या मोठ्या नेत्याने मायावतींबद्दल सकारात्मक विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये बहुजन समाज पक्ष (BSP) आणि मायावतींविरोधात अधिक आक्रमक भूमिका दाखवलेली नाही.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बसपाबद्दलच्या मवाळ वृत्तीबद्दल निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, “आमचा कोणत्याही पक्षाशी करार नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाप्रमाणेच बसपाही भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी तीन विरोधी पक्ष लढत आहेत. भाजपा 2014 (लोकसभा). 2017 (विधानसभा निवडणुका) आणि 2019 (लोकसभा निवडणुका) च्या कामगिरीची पुनरावृत्ती करू आणि बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.

यूपीमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा केला मात्र त्यांनी निवडणुकीनंतर बसपासोबत युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com