VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Maulana Jarjis Ansari Controversial Statement Lord Krishna: उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असलेले मौलाना जरजिस अंसारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
Maulana Zarjees Ansari speaking during a public event in a viral video
Maulana Zarjees Ansari StatementDainik Gomantak
Published on
Updated on

Maulana Jarjis Ansari Controversial Statement Lord Krishna: उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असलेले मौलाना जरजिस अंसारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांनी थेट भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद्भगवद्गीतेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. झारखंडमध्ये 23 जून रोजी आयोजित एका धार्मिक सभेत बोलताना मौलाना जरजिस यांनी दावा केला की, भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्षात 'दीन' म्हणजेच इस्लाम धर्माचा प्रचार करत होते. इतकेच नव्हे तर, भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे, असा विनाधार आणि विचित्र दावाही त्यांनी केला. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून हिंदू संघटनांनी मौलानांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे.

आपल्या विधानाचा खोटा दाखला देण्यासाठी मौलाना जरजिस यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा ('योगी युञ्जीत सततमात्मानं एकाकी') उल्लेख केला. या श्लोकाचा विपर्यास करत ते म्हणाले की, "माझ्या हिंदू भावांनी वाईट मानू नये, पण श्रीकृष्ण सुद्धा पाचवेळा नमाज पठण करायचे. गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनला सांगत आहेत की, जेव्हा देवाची पूजा कराल तेव्हा संपूर्ण शरीराचा योग करा. येथे योग म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नव्हे, तर संपूर्ण शरीराने केलेली प्रार्थना होय.

Maulana Zarjees Ansari speaking during a public event in a viral video
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

आज हिंदू (Hindu) धर्मात लोक फक्त हात जोडतात आणि पूजा संपते." पुढे बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. "योगीजी स्वतःला रामाचे मोठे भक्त मानतात, पण त्यांनी जर आपली धार्मिक पुस्तके नीट वाचली, तर ते इस्लामच्या प्रेमात पडतील. कारण इस्लाम हा केवळ मुस्लिमांचा धर्म नसून तो प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांनीही सांगितलेला धर्म आहे," असा अजब दावाही मौलानांनी केला.

Maulana Zarjees Ansari speaking during a public event in a viral video
Uttar Pradesh Crime: हिंदू मुलींच्या बेकायदेशीर धर्मांतरणासाठी 1,000 हून अधिक मुस्लिम तरुणांना द्यायचा पैसे; छंगूर बाबाबाबत मोठा खुलासा!

धार्मिक ग्रंथांचा आणि इतिहासाचा कोणताही थेट संबंध नसताना, केवळ स्वतःच्या अजेंड्यासाठी पवित्र हिंदू ग्रंथांचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे मौलानांवर चहूबाजूंनी टीका होत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मौलानांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. विविध हिंदू संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत, समाजात धार्मिक तेढ आणि द्वेष पसरवल्याप्रकरणी मौलाना जरजिस अंसारी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. धार्मिक भावना दुखावल्यामुळे या प्रकरणावरुन वातावरण कमालीचे तापले असून, अशा चिथावणीखोर वक्तव्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी असा सूर उमटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com