Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

Ludhiana Pilgrims Boat Accident in Mathura: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली. वृंदावन येथील यमुना नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण अपघात झाला.
Ludhiana Pilgrims Boat Accident in Mathura
Mathura Boat AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Ludhiana Pilgrims Boat Accident in Mathura: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली. वृंदावन येथे यमुना नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. हा अपघात शुक्रवारी (10 एप्रिल) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास केशी घाटावर झाला, जो श्री बांके बिहारी मंदिरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये सुमारे 27 प्रवासी होते. यमुना नदीवरील पांटून पुलाला बोटीची जोरात धडक बसली आणि ती उलटली. धडक इतकी भीषण होती की, कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गोताखोर आणि वैद्यकीय पथकांनी तात्काळ धाव घेतली. आग्रा परिक्षेत्राचे डीआयजी शैलेश पांडे यांनी सांगितले की, बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये सर्व भाविक पंजाबमधील (Panjab) लुधियाना येथील रहिवासी असल्याचे समजते, जे वृंदावनमध्ये दर्शनासाठी आले होते.

Ludhiana Pilgrims Boat Accident in Mathura
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

मथुरेचे (Mathura) जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत 14 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले. उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराची मदत मागवण्यात आली आहे. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून बेपत्ता असलेल्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

Ludhiana Pilgrims Boat Accident in Mathura
Uttar Pradesh Crime: ‘’ती दुसऱ्या मुलाशी बोलत होती म्हणून...’’; आरोपी तरुणाने दिली गुन्ह्याची कबुली

दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदत कार्य राबवण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले. तसेच, मृतांच्या वारसांना योग्य भरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मथुरेतील ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक असून ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

Ludhiana Pilgrims Boat Accident in Mathura
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

यमुना नदीच्या पात्रात पांटून पुलाजवळ चाललेल्या या बचाव कार्यात स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली. प्राथमिक माहितीनुसार, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीमध्ये असणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे तो पुलाला धडकणे, या शक्यतांची सध्या चौकशी केली जात आहे. लुधियानाहून भक्तीभावाने दर्शनाला आलेल्या या कुटुंबांवर काळाने घातलेल्या या घाप्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com