Arunachal Pradesh Landslide: कारवर कोसळले भलेमोठे दगड, प्रवासी थोडक्यात बचावले; अरुणाचल प्रदेशातील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ

Arunachal Pradesh Landslide Video: मोठ्या भूस्खलनामुळे दिरंग आणि तवांग दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सॅपर कॅम्पजवळ ही घटना घडली, ज्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील रस्ता संपर्क खंडित झाला.
Arunachal Pradesh Landslide Video
LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

Arunachal Pradesh Landslide Video: अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात सोमवारी (25 ऑगस्ट) दुपारी झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे दिरंग आणि तवांग दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सॅपर कॅम्पजवळ ही घटना घडली, ज्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील रस्ता संपर्क खंडित झाला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी रांग लागली.

नेमकी घटना काय घडली?

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही दरड पद्मा हॉटेलजवळ कोसळली, ज्यामुळे सुमारे 120 मीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे बंद झाला. डोंगरावरुन मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा खाली आला, ज्यामुळे रस्ता वाहनांसाठी पूर्णपणे धोकादायक बनला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत, ज्यात त्या क्षणी निर्माण झालेला गोंधळ आणि भीती स्पष्टपणे दिसत आहे.

Arunachal Pradesh Landslide Video
Arunachal Pradesh Crime: अरुणाचल प्रदेशात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 8 अधिकारी आणि पोलिसांसह 21 जणांना अटक

व्हिडिओमध्ये दगड कोसळत असताना लोक घाबरुन पळताना दिसले. तर काही वाहनचालक इतरांना ओरडून वाहने तात्काळ मागे घेण्यास सांगत होते. अनेक लोक आपल्या गाड्यांमधून बाहेर पडले आणि आणखी दगड कोसळत असताना सुरक्षित ठिकाणी धावत गेले. व्हायरल व्हिडिओमध्ये काही दगड थेट गाड्यांवर आदळतानाही दिसले. या दुर्घटनेत दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पर्यटकांसह स्थानिकांनाही त्रास

दिरंग-तवांग मार्ग हा स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. अचानक झालेल्या या भूस्खलनामुळे अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक रस्त्यातच अडकून पडले.

Arunachal Pradesh Landslide Video
Arunachal Pradesh मधील 'या' सुंदर ठिकाणांना भेट देऊन ट्रिप बनवा अविस्मरणीय

प्रशासनाचे तात्काळ बचावकार्य सुरु

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून तात्काळ बचावकार्य सुरु केले. रस्त्यावरील ढिगारा आणि दगड हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी काम सुरु आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले की, तवांगच्या दिशेने जाणाऱ्या किंवा तेथून परत येणाऱ्या प्रवाशांनी रस्ता पूर्णपणे मोकळा आणि सुरक्षित घोषित होईपर्यंत प्रतीक्षा करावी. सध्या धोका असल्यामुळे घाई करणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com