Arunachal Pradesh Sex Racket: अरुणाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अरुणाच प्रदेश पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अरुणाचल प्रदेश पोलिसांनी इटानगरमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असलेल्या आंतरराज्यीय लैंगिक तस्करी आणि वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील पाच मुलींना वाचवण्यात यश आले आहे. 10 दिवस चाललेल्या या छापेमारीत पोलिसांनी तस्कर, दलाल आणि ग्राहकांसह 21 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये आठ सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिस अधिकारीही आहेत.
पोलिसांनी (Police) सांगितले की, सर्व मुली आसाममधील धेमाजी आणि उदलगुरी येथील गरीब कुटुंबातील होत्या, त्यांना पैशाच्या बहाण्याने 2020 ते 2023 दरम्यान इटानगर येथे आणण्यात आले आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या मुलींपैकी एका मुलीला 2020 मध्ये इटानगरला आणण्यात आले तेव्हा ती केवळ आठ वर्षांची होती. इटानगर एसपी रोहित राजबीर सिंग यांनी सांगितले की, 'ती पळून जाण्यात यशस्वी झाली, पण 2022 मध्ये तिला परत आणण्यात आले.'
याहूनही क्लेशदायक बाब म्हणजे प्राथमिक वैद्यकीय अहवालात तीन मुलींची प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे दिसून आले आहे. एचआयव्ही-एड्ससारख्या गंभीर आजाराची लक्षणे त्यांना दिसू लागली आहेत.
पोलिसांनी सांगितले की, विश्वसनीय माहितीच्या आधारे, चिम्पू येथील टेची रीना उर्फ अनिया आणि जामलो तागुंग यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. येथून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. इतर दोघींनी धेमाजी येथून पुष्पांजली मिली उर्फ टुटू मिली आणि पूर्णिमा मिली या दोन बहिणींची तस्करी केल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी तेची आणि जमलो यांच्यासोबत मिळून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. पहिल्या 15 कैद्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईत अरुणाचल सशस्त्र पोलिसांच्या पहिल्या बटालियनमध्ये तैनात असलेले पोलिस उपअधीक्षक बुलंग मारिक यांच्यासह आणखी सहा जण, एक पोलिस हवालदार, तीन दलाल आणि आणखी एकाला अटक करण्यात आली.
पोलिसांनी एका जोडप्याला ओळखले - दुलाल बासुमातारी (52) आणि दीपाली बासुमातारी (44). हे इटानगरमधील झू रोडवर सिटी हॉटेल चालवायचे. यामध्ये हॉटेल व्यवस्थापक दीपक पराजुली (24) याचाही सहभाग होता. दीपक बसुमातारी हा उदलगुरीचा रहिवासी आहे आणि पराजुली हा आसामच्या नारायणपूरचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींना आणखी दोन महिलांसोबत वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन हॉटेल्स आणि ब्युटी पार्लरचीही पोलिसांनी ओळख पटवली आहे. अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) महिला आयोगाच्या अध्यक्षा केंजूम पाकम यांनी राज्य सरकारला बाल तस्करी आणि लैंगिक शोषण रॅकेटमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
आयोगाने आपल्या एका निवेदनात म्हटले की, राज्यातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करी या जघन्य गुन्ह्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात महिला आणि विद्वानांचा सहभाग असल्याचे कळणेही लाजिरवाणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.