Viral Video: चोरी केली, पण नशिबानं खेळ केला! कारचालकानं भररस्त्यात चोराला ठेचलं; नेटकरी म्हणाले,"कर्माचा स्पीड पाहून 5जी इंटरनेटही लाजेल!"

Instant Karma Bike Thief Viral Video: व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला काही सामान घेऊन रस्त्यावरुन जाताना दिसते. तितक्यात तिथे एका दुचाकीवरुन एक संशयास्पद तरुण येतो.
viral video of thief caught on road
viral video of thief caught on roadDainik Gomantak
Published on
Updated on

Instant Karma Bike Thief Viral Video: आजच्या काळात सोशल मीडिया वापरत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आपल्या कामातून थोडा वेळ मिळाला की सोशल मीडियाच्या जगात रमून जातो. जर तुम्ही इंटरनेटवर ॲक्टिव्ह असाल, तर तुम्हाला माहीत असेलच की दररोज इथे शेकडो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मनोरंजक असतात, तर काही प्रचंड धक्कादायक असतात.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चोराला त्याच्या पापाचे फळ अवघ्या काही सेकंदांत मिळाले. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स थक्क झाले असून 'पापाचे प्रायश्चित्त इतके लवकर मिळते' याचा जिवंत पुरावाच या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला काही सामान घेऊन रस्त्यावरुन जाताना दिसते. तितक्यात तिथे एका दुचाकीवरुन एक संशयास्पद तरुण येतो. त्याला पाहताच धोक्याची जाणीव झाल्याने ती महिला तिथून पळू लागते. परंतु, तो दुचाकीस्वार चोर तिच्या मागे जातो आणि जबरदस्तीने तिच्या हातातील बॅग हिसकावून घेतो. महिला काही समजण्याच्या आत तो चोर बॅग घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, निसर्गाचा न्याय बघा, तो चोर पळत असतानाच समोरुन एक कारचालक तिथे येतो. चोराची ही करामत कारचालकाच्या नजरेत येते आणि तो कसलाही विचार न करता आपल्या कारने थेट चोराच्या दुचाकीला जोरात धडक देतो.

viral video of thief caught on road
Viral Video: महिलेची बॅग पळवणे चोराला पडले भारी, कार चालकाने रस्त्यावरच केला 'गेम' ओव्हर! पाहा व्हायरल व्हिडिओ

धडक बसल्यामुळे चोर दुचाकीसह खाली कोसळतो. तो पुन्हा उठून दुचाकीवरुन पळण्याचा प्रयत्न करतो, पण कारचालक त्याला सोडायला तयार नसतो; तो पुन्हा एकदा चोराला गाडीने उडवतो. या दुसऱ्या धडकेमुळे घाबरलेला चोर अखेर ती चोरी केलेली बॅग तिथेच टाकून देतो आणि आपली दुचाकी घेऊन जीव वाचवण्यासाठी पळू लागतो. थरार इथेच संपत नाही, तो चोर पळत सुटल्यावर कारचालक आपली गाडी रिव्हर्स घेतो आणि पाठलाग सुरु करतो. कारचालक बराच दूरपर्यंत चोराचा थरारक पाठलाग करतो. मात्र, अखेर तो चोर एका गल्लीबोळातून पळून जाण्यात यशस्वी होतो आणि कारचालक महिलेला मदत करुन आपल्या मार्गाने निघून जातो.

viral video of thief caught on road
Viral Video: व्हायरल होण्यासाठी काहीही? भर बाजारात तरूणीचा टॉवेलवर डान्स! नेटकरी भडकले

हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, 'एक्स' वर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एका युझरने लिहिले की, 'कर्मा खरोखरच खूप लवकर परत आला.' तर दुसऱ्याने लिहिले, 'हिशोब खूप लवकर पूर्ण झाला.' एका युझरने तर कर्माची तुलना थेट 5जी इंटरनेट स्पीडशी केली. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com