मल्याळम अभिनेता श्रीजीथ रवी (Actor Sreejith Ravi Arrested) याला दोन अल्पवयीन मुलींसमोर नग्नता दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हा अभिनेता ज्येष्ठ अभिनेते टीजी रवी यांचा मुलगा असून त्याला कलम 11 अंतर्गत अटक केली आहे. या कलमांतर्गत कलम 11 पोक्सो (Protection of Children from Sexual Offences) उल्लेख करण्यात आला आहे, जो लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आला आहे. (Malayalam actor Sreejith Ravi arrested in POCSO case)
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिशूरमध्ये 4 जुलै रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीजीत त्याच्या कारमध्ये बसला होता तेव्हा दोन अल्पवयीन मुली सोबत आल्या होत्या अभिनेत्याने त्याच्या कारमधून बाहेर पडून आपली नग्नता दाखवली.
Onmanorama.com या वेबसाईटनुसार पोलिसांनी वाहनाच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला, घटना आणि तपासादरम्यान श्रीजीतवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे. आपली वागणूक चांगली नसल्याची कबुली दिली आहे.
श्रीजीत अशा प्रकरणात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधीही तो काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणामध्ये अडकला होता. रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात येत आहे की, श्रीजीतला 2016 मध्ये देखील अटक करण्यात आली होती.
यादरम्यान पलक्कडच्या 14 शालेय विद्यार्थिनींच्या गटाने त्याच्यावर सार्वजनिकरित्या उघड केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. मात्र, त्यादरम्यान त्यांना जामीनही मिळाला होता आणि नंतर प्रकरण मिटले. या प्रकरणी मुलांच्या पालकांनी पोलिसांवर आवश्यक पुरावे गोळा न करता तोडफोड केल्याचा देखील आरोप केला होता.
श्रीजीतने 2005 मध्ये 'मायोखम' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्याच वर्षी 'चंथुपोट्टू' चित्रपटातून त्याला मोठा ब्रेक मिळाला तसेच अनेक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. याशिवाय त्यांने मिशन 90 डेज, Punyalan Agarbattis आणि Punyalan Private Limited काम केले आहे.
त्याने इतर साऊथ चित्रपटांमध्येही काम केले. तसेच त्याच्या तमिळ चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याने वेट्टाई, कुमकी, मधा यानाई कूट्टम, कथक आणि असुरवधम या चित्रपटांचा देखील भाग आहे. त्याने बऱ्याचश्या कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.