नवीन चिंता! ओमिक्रॉनचा BA.2.75 नवीन प्रकार भारतात आढळला

भारतात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
new type of Omicron
new type of OmicronDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात कोविड-19 च्या (Covid 19 Patients In India) रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, Omicron चे नवीन सब-व्हेरियंट BA.2.75 देशात सापडल्याची बातमी समोर आली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. असे सांगण्यात आले की आधी ही उप-वंश भारतात ओळखले गेले आणि नंतर ते उप-वंश इतर देशांमध्येही झपाट्याने पसरले. सध्या, WHO BA.2.75 चे निरीक्षण करत आहे असे सांगण्यात आले आहे. (New worries BA.2.75 new type of Omicron appeared)

new type of Omicron
नूपूर शर्माला धमकी देणाऱ्या सलमान चिश्तीला अजमेर पोलिसांचा समज देणारा Video Viral

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, 'गेल्या दोन आठवड्यात जगभरात आढळलेल्या प्रकरणांमध्ये सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाली. WHO च्या 6 पैकी 4 उपक्षेत्रांमध्ये गेल्या आठवड्यात रुग्ण वाढळून आले आहेत. “युरोप आणि अमेरिकेत BA.4 आणि BA.5 ची लाट आली. BA.2.75 च्या नवीन ओळी भारतासारख्या देशातही सापडल्या आहेत, ज्या सध्या आपण पाहत आहोत.

WHO चे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी देखील BA.2.75 बद्दलची माहिती दिली आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, त्यांनी स्पष्ट केले की BA.2.75 'पहिल्यांदा भारतामध्ये सापडला होता, त्यानंतर 10 इतर देशांमध्ये सापडला.'

त्यांनी निदर्शनास आणून दिले की उप-प्रकारांचे विश्लेषण करण्यासाठी अजूनही खूप मर्यादित क्रम उपलब्ध असणार आहेत. 'आम्हाला वाट बघावी लागेल,' ते म्हणाले. स्वामीनाथन म्हणाले की डब्ल्यूएचओ त्याचा मागोवा घेत आहे आणि डब्ल्यूएचओ तांत्रिक सल्लागार गट जगभरातून येणाऱ्या डेटावर देखील लक्ष ठेवून आहे.

new type of Omicron
PM मोदींच्या लोकसभा मतदारसंघ काशीमध्ये बांधण्यात आले सर्वात मोठं स्वयंपाकघर

भारतातील कोरोनाव्हायरसची अलीकडील प्रकरणे काय आहेत

भारतात कोरोनाव्हायरस संसर्गाची 18 हजार 930 नवीन प्रकरणे नोंदवली आहेत. त्याच वेळी, या कालावधीत 35 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. नवीन आकडेवारीसह, भारतातील रुग्णांची संख्या 4 कोटी 35 लाख 66 हजार 739 वर पोहोचली आणि आतापर्यंत 5 लाख 25 हजार 305 कोविड बाधितांनी आपला जीव देखील गमावला आहे. सध्या 1 लाख 19 हजार 457 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या घटत्या क्रमवारीत गेल्या 24 तासांत 3142 नवीन रुग्ण आढळून आले असून आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, नवीन रुग्णांसह एकूण संक्रमित लोकांची संख्या 79,93,051 वर गेली, तर या आजाराने मृतांची संख्या 1,47,956 वर गेली. याच कालावधीत 3142 रुग्ण बरे झाले असून यासोबतच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 78,25,114 झाली आहे.

दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 600 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि महामारीमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला तर संसर्ग दर 3.27 टक्क्यांवर आला आहे. आरोग्य विभागाने बुधवारी येथे शेअर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले की दिल्लीत एकूण संसर्गाची संख्या 19,38,648 झाली आणि मृतांची संख्या 26,276 वर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com