Kaali Controversy: लीना मणिमेकलईने ट्वीट केलेला फोटो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Leena Manimekalai Twitter: लीना मणिमेकलई यांनी पुन्हा एक वादग्रस्त ट्वीट शेअर केलं आहे.
Kaali Movie Poster Controversy |Leena Manimekalai New Tweet
Kaali Movie Poster Controversy |Leena Manimekalai New TweetDainik Goamntak
Published on
Updated on

लीना मणिमेकलई प्रसिध्द दिग्दर्शिका गेल्या काही दिवसांपासून (Leena Manimekalai) त्यांच्या काली (Kaali) या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे वादला सुरूवात झाली. या पोस्टरमध्ये दाखवलेल्या दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे अनेकांचे मत आहे. लीना मणिमेकलई यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात होती. या सर्व वादानंतर लीना यांनी पुन्हा एक फोटो शेअर केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. (Kaali Controversy Leena Manimekalai twit News)

* लीना यांचं नवं ट्वीट
आज सकाळी लीना यांनी एक ट्वीट शेअर केल आहे. यामध्ये एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये शंकर आणि पार्वती यांची भूमिका साकारणारे कलाकार सिगारेट ओढत फिरतांना दिसत आहे. 'दुसरीकडे कुठेतरी', असं कॅप्शन लीना यांनी या ट्वीटला दिलं आहे. या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. (Kaali Movie Poster Controversy)

* नेमकं प्रकरण काय?
दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या या लघु चित्रपटाचे नाव ‘काली’ आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. तर एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील युझर्स खुप संतापले आहेत.

Kaali Controversy |Leena Manimekalai
Kaali Controversy |Leena ManimekalaiDainik Gomantak

* काली' डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबद्दल लीना यांनी मांडलं होतं मत
वादग्रस्त पोस्टरवरून सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ट्रोलिंगनंतर लीना यांनी आणखी एक ट्वीट (Twit) केले होते. दक्षिणात्य भाषेत असलेल्या आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. मला एक असा आवाज बनायचंय जो कधीही कुणाला घाबरणार नाही. याची किंमत जर माझा जीव असेल तरी बेहत्तर..मी तो देईन.’ या आधी त्यांनी आपल्या या चित्रपटाबाबत (Movie) सांगताना लिहिले होते की, 'हा चित्रपट संध्याकाळच्या त्या घटनांभोवती फिरतो, जेव्हा तिला काली दिसते आणि ती टोरंटोच्या रस्त्यावर फिरते.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com