Chandrayaan 3 Has Sent Videos And Photos Of Moon To ISRO:
चांद्रयान 3 चंद्राच्या जवळ पोहचत आहे. अशातच चांद्रयान 3 ने इस्रोला असे काही व्हिडीओ आणि फोटो पाठवले आहेत, जे खरोखरच अकल्पनीय आणि अविश्वसनीय आहेत.
चांद्रयान 3 ने नुकतेच हे व्हिडिओ आणि फोटो इस्रोला पाठवले आहेत. व्हिडिओमध्ये चंद्रावर हिरव्या आणि निळ्या रंगाचे अनेक खड्डे पाहायला मिळत आहेत.
चांद्रयान 3 ने प्रथमच पाठवले हे फोटो आणि आणि व्हिडिओ, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर एका दिवसानंतर म्हणजेत 6 ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रयान-3 ने पाहिलेला चंद्राचा व्हिडिओ जारी केला.
भारताची तिसरी मानवरहित चंद्र मोहीम 'चांद्रयान-3' ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी 22 दिवसांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आले होते, जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही.
चांद्रयान-3 ने इस्रोला संदेश पाठवला की "मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत आहे" बेंगळुरूमधील अंतराळ युनिटकडून आवश्यक प्रक्रिया पार पाडल्यानंतर चंद्रयान-3 कोणत्याही अडथळ्याशिवाय चंद्राच्या जवळ पोहचवण्यात आले.
14 जुलै रोजी प्रक्षेपित झाल्यापासून, अंतराळयानाने चंद्रापर्यंतचे जवळजवळ दोन तृतीयांश अंतर कापले आहे आणि पुढील 18 दिवस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (ISRO) महत्त्वपूर्ण असतील.
इस्रोने उपग्रहाकडून (Satellite) मिळालेला संदेश त्यांच्या केंद्रांसह सार्वजनिक केला होता, ज्यात लिहिले होते,
"MOX, ISTRAC, हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.