Viral Video: टोल कर्मचाऱ्याला कारचालकाने चिरडले

Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार चालकाने पहिल्यांदा टोल गेट तोडले आणि नंतर टोल प्लाझा कर्मचाऱ्याला त्याच्या कारने धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Viral Video Toll employee crushed by car driver
Viral Video Toll employee crushed by car driverDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video Of Toll Employee Crushed By Car Driver:

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूरमध्ये एका भीषण घटनेत कार चालकाने टोल प्लाझा कर्मचाऱ्या हापूरला चिरडले येथील पिलखुवा टोल प्लाझा येथे ही घटना घडली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार चालकाने रागाच्या भरात पहिल्यांदा टोल गेट तोडले आणि नंतर टोल प्लाझा कर्मचाऱ्याला त्याच्या कारने धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेत कार चालकाने आधी टोल प्लाझाचे (Toll Plaza) गेट तोडले आणि पैसे न देता पळून जात असल्याचे दिसत आहे. टोल प्लाझा कर्मचाऱ्याने कारचा पाठलाग केला, पण कारचालक पैसे न देता पळून गेला.

काही अंतर गेल्यावर कार चालक पुन्हा टोल प्लाझाच्या दिशेने परतला आणि त्याची कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला काही अंतरापर्यंत कारखाली फरफटत नेले.

Viral Video Toll employee crushed by car driver
Watch Video: गांजा तस्करीत पोलिसांच्या सहभागाचा आरोप; संतप्त जमावाने पेटवले पोलीस ठाणे

कार चालक फरार

टोल कर्मचाऱ्याला गाडीखाली चिडल्यानंतर कार चालकाने तेथून पळ काढला. टोल प्लाझाच्या कर्मचार्‍यांची प्रकृती कशी आहे, हे अद्याप कळू शकलेली नाही.

या कर्मचाऱ्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात (Government Hospital) नेण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गार्डची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Viral Video Toll employee crushed by car driver
MK Stalin: "हिंदीचे गुलाम बनणार नाही", गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा आक्षेप

पिलखुआ सर्कलचे पोलीस उपाधिक्षक वरुण मिश्रा यांनी एएनआयला सांगितले की, "एका व्यक्तीने छाजरसी टोल प्लाझा कर्मचाऱ्याला जाणूनबुजून त्याच्या कारखाली चिरडले. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला लवकरात लवकर पकडले जाईल."

टोल प्लाझा हिंसाचाराच्या अशा अनेक घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. टोल प्लाझा कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी असा हिंसाचार टाळण्यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलावीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com