Khalistani Terrorist Prabhjeet Singh Arrested: पंजाब पोलिसांनी खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा दहशतवादी प्रभप्रीत सिंग जर्मनी याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. प्रभप्रीत जर्मनीतून दहशतवाद्यांची भरती, मदत आणि निधी पुरवण्याचे मॉड्यूल चालवत होता. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. आरोपीला 15 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. डीजीपी यादव म्हणाले की, जर्मनीतील दहशतवादी प्रभप्रीत सिंग देशातील खलिस्तानी दहशतवादी गटासाठी तरुणांची भरती करत होता. देशभरातील तरुणांची भरती करण्यासाठी त्याने 20 ते 25 जणांचे जाळे तयार केले होते.
डीजीपी गौरव यादव म्हणाले की, 2020 मध्ये एसएसओसी अमृतसरला खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा दहशतवादी जगदीश सिंग भुरा हा पंजाबमधील काही हाय-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती आणि हे काम पूर्ण करण्यासाठी त्याने योजनाही आखली होती. त्याने साथीदारांना शस्त्रे आणि पैसे दिले होते. पंजाब पोलिसांनी या गटाशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक करुन संपूर्ण मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. त्या प्रकरणात, 19 डिसेंबर 2020 रोजी UAPA आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, ते वाँटेड दहशतवादी जगदीश सिंग भुरा आणि त्याचा जवळचा सहकारी प्रभप्रीत सिंग यांच्या आदेशानुसार काम करत होते. त्यावेळी प्रभप्रीत जर्मनीत राहत होता, त्यामुळे पंजाब पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून लुक आऊट सर्क्युलर जारी केले होते. बुधवारी जेव्हा तो दिल्ली विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी थांबवले आणि अमृतसरच्या जबलपूर पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलला कळवले. त्यानंतर त्यांच्या पथकाने तात्काळ त्याला अटक केली.
डीजीपी म्हणाले की, ''दहशतवादी प्रभप्रीत 2017 मध्ये पोलंडला गेला होता, मात्र तेथून 2020 मध्ये जर्मनीला गेला आणि त्याने तिथे राजकीय आश्रय मागितला होता. तिथे तो बेल्जियममध्ये राहणारा खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा जगदीश सिंग भुरा याच्या संपर्कात आला आणि नंतर तो खलिस्तानी संघटनेत सामील झाला. आरोपीला 15 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.