Action Against Gurpatwant Singh Pannu: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.
ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे भारत कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातच आता, एनआयएने अमेरिकास्थित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूवर मोठी कारवाई केली आहे.
एनआयएने पंजाबमधील चंदीगड आणि अमृतसर येथील पन्नूची मालमत्ता जप्त केली आहे. अमृतसरमधील शेतजमीन आणि चंदिगडमधील पन्नूची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
डॉसियर हाती आल्यानंतरही कॅनडाने अमेरिकेत बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यावर कारवाई केली नाही. यावरुन कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत मोठा खुलासा झाला आहे.
एजन्सींच्या अहवालामुळे ट्रुडो सरकारचा पर्दाफाश झाला आहे. गुरपतवंत सिंग पन्नूसह अनेक खलिस्तानींच्या डॉजियरच्या प्रती कॅनडाच्या सरकारला सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
भारतीय एजन्सींनी डॉजियरची कॉफी तयार केली होती. त्यात दहशतवादी हरदीप निज्जरच्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी होती. दहशतवादी निज्जर आणि पन्नू यांची माहिती कॅनडासोबत शेअर करण्यात आली होती. पण कॅनडाने दोन्ही दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
कॅनडात (Canada) मारल्या गेलेल्या खलिस्तानी दहशतवादी निज्जरबाबत भारताने कॅनडा सरकारला वेळोवेळी माहिती दिली होती आणि त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आल्याची माहिती दिली होती.
पण कॅनडाच्या प्रशासनाने निज्जरवर कधीही कारवाई केली नाही, अमेरिकेनेही निज्जरला आपल्या नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकले होते. निज्जरला अमेरिकेत जाण्यावर बंदी होती.
दहशतवादी हरदीप निज्जरच्या गुन्ह्यांबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. 2012 मध्ये निज्जर पाकिस्तानात गेला होता आणि तिथे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही घेतले होते. कॅनडातील गुरुद्वाराबाहेर मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या गुन्ह्यांची यादी खूप मोठी आहे.
हरदीप निज्जर हा दहशतवादी (Terrorist) होता. कॅनडाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर निज्जरने आपले मनसुबे राबवण्यास सुरुवात केली होती.
खलिस्तानच्या मुद्द्यामध्ये रस असल्याने निज्जर शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला होता. या संघटनेवर भारतात अजूनही बंदी आहे.
हरदीप सिंग निज्जर हा KCF दहशतवादी गुरदीप सिंग उर्फ दीपा हेरनवालाचा सहकारी होता. दीपा हेरनवालाचा पंजाबमध्ये 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990 च्या सुरुवातीच्या काळात झालेल्या 200 हून अधिक हत्यांमध्ये सहभाग होता.
2012 मध्ये निज्जरने पाकिस्तानला भेट दिली आणि बब्बर खसला इंटरनॅशनलचे प्रमुख जगतार सिंग तारा यांच्या संपर्कात आला. ताराने निज्जरला शस्त्रे आणि आयईडी वापरण्याचे प्रशिक्षण दिले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.