Kerala: राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची विद्यापीठाच्या कुलपती पदावरुन हकालपट्टी

Kerala Governor Arif Mohammed Khan: राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना केरळ कलामंडलम डीम्ड-टू-बी विद्यापीठाच्या कुलपती पदावरुन हटवण्यात आले आहे.
 Arif Mohammad Khan
Arif Mohammad KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना केरळ कलामंडलम डीम्ड-टू-बी विद्यापीठाच्या कुलपती पदावरुन हटवण्यात आले आहे. डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारने गुरुवारी (10 नोव्हेंबर) केरळ कलामंडलम डीम्ड विद्यापीठाच्या नियमांमध्ये सुधारणा केली. जेणेकरुन राज्यपालांना कुलपती पदावरुन हटवता येईल. आता कला-संस्कृती क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाईल.

दरम्यान, केरळ सरकारने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांना राज्यातील विद्यापीठांचे उच्चपद भूषवायचे नाही, असे म्हटले होते. पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने कला आणि संस्कृतीवरील डीम्ड विद्यापीठाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा आदेश जारी केला आहे.

 Arif Mohammad Khan
Kerala CM VS Governor: राज्यपालांना कुलपतीपदावरून हटविण्याची तयारी; केरळ सरकार आणणार अध्यादेश

राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाद सुरु

केरळ (Kerala) कलामंडलम वेबसाइटनुसार, खान सध्या कुलपती आहेत. केरळ सरकारने हे पाऊल राज्यातील कुलगुरुंच्या नियुक्तीसह विद्यापीठांच्या कामकाजावर गव्हर्नर खान यांच्यासोबत सरकारच्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. डीम्ड युनिव्हर्सिटीच्या सुधारित नियमांमध्ये असे म्हटले की, केरळ कलामंडलमचे प्रशासन आणि व्यवस्थापन संरचना राज्य सरकारच्या निर्णयानुसार असेल.

 Arif Mohammad Khan
Kerala MP's Son Disrobed: केरळच्या खासदाराच्या मुलाची विमानतळावर विवस्त्र करून तपासणी

काँग्रेस-भाजपने विरोध केला

काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (BJP) या दोन्ही पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. केरळ सरकारचे हे पाऊल राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यासोबत राज्याच्या विद्यापीठांमध्ये कुलगुरुंच्या नियुक्ती आणि इतर मुद्द्यांवरुन सुरु असलेल्या विरोधादरम्यान आले आहे. केरळमधील विद्यापीठांना "डाव्या विचारसरणीचे केंद्र" बनवण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस (Congress) आणि भाजपने या निर्णयाला विरोध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com