Karnataka हादरलं! MBA च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
Rape
RapeDainik Gomantak

कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूर येथे 22 वर्षीय एमबीए (MBA) विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक, ती विद्यार्थी चामंडी हिलहून म्हैसूरला एका मित्रासोबत येत होती, दरम्यान पाच ते सहा नराधमांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. पोलिस चौकशी दरम्यान या विद्यार्थीनीच्या मित्राने सांगितले की, जेव्हा तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्यांनी मला मारहाण केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या या विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक असल्याचे कर्नाटक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या महिलेची ओळख पटली असून ती कर्नाटक बाहेरील आहे, जी म्हैसूरमध्ये शिकण्यासाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मोलमजूरी करणाऱ्या व्यक्तिंना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Rape
आसाम आणि मेघालय सीमावाद, सीमेवर पुन्हा राडा

आरोपी मद्यधुंद होते

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी नशेत होते जेव्हा त्यांनी जोडप्याला चामुंडी टेकड्यांशेजारील निर्जन रस्त्यावर पाहिले. आधी त्यांनी कथितरित्या दोघांना लुटण्याचा प्रयत्न केला, नंतर त्यांनी या विद्यार्थीनीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अलनहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Rape
आसाम आणि मिझोराममधील संघर्षानंतर निमलष्करी दलाची नियुक्ती

पीडितेला म्हैसूर येथील रुग्णालयात दाखल केले

म्हैसूरचे पोलीस आयुक्त चंद्रगुप्त म्हणाले, “ या विद्यार्थीनीला म्हैसूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “या बाबी अत्यंत संवेदनशील आहेत. आम्ही याक्षणी तपशील देऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीडितेचे स्टेटमेंट मिळाल्यानंतर हा हल्ला कसा झाला हे समजेल. दरम्यान, त्याच्या मित्राने निवेदन दिले आहे. आणि आम्ही त्यावर आधारित एफआयआर नोंदवला आहे. आम्ही तपासासाठी पोलिसांची विशेष पथके तयार केली आहेत. आम्ही त्याकडे सर्व दृष्टीने विचार करुन पहात आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com