आसाम आणि मेघालय सीमेवरचा वाद (Asama Meghalaya Border Dispute ) काही केल्या कमी होताना दिसत नाही . आता या वादग्रस्त आंतरराज्य सीमा भागाजवळ शेजारच्या आसाममधील लोकांचे मोठे गट समोरासमोर आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात मेघालयचा एक पोलीस अधिकारी बुधवारी जखमी झाला आहे.या अधिकाऱ्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची परिस्थिती सध्या चार आहे. आसाम आणि मेघालयातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंच्या सैन्याने घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.(Assam Meghalaya border dispute one police officer injured)
ही घटना आसामच्या पश्चिम कर्बी (west karbi) आंगलाँग (Karbi Anglong) जिल्ह्यातील उमलापार (Oolampara) येथे घडली असून या ठिकाणी मेघालयच्या री-भोई जिल्ह्यातील सुमारे 250-300 लोकांचा एक गट दोन व्यक्तींना भेटायला गेला ज्यांच्याशी सोमवारी रात्री आसाम पोलिस (Assam Police) कर्मचाऱ्यांनी कथितपणे त्रास दिला होता . मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून आलेल्या आंदोलकांनी एका बंकरचे देखील नुकसान केले आहे .
ते लोक वापस मात्र गावाकडे जाताना मात्र स्थानिक रहिवाशांनी रस्ता अडवला आणि मेघालयातील लोकांशी संघर्ष केला, असे पश्चिम कर्बी आंगलोंग जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. री-भोई जिल्ह्याचे एसपी एन लमारे यांनी सांगितले की, जमावाला पांगवण्यासाठी दोन्ही राज्यांतील पोलीस पथके घटनास्थळी पोहोचली. लमारे यांनी सांगितले की, हाणामारी दरम्यान एक डेप्युटी एसपी जखमी झाला. त्याला जवळच्या वैद्यकीय युनिटमध्ये नेण्यात आले आणि आता तो धोक्याबाहेर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.