आसाम आणि मिझोराममधील संघर्षानंतर निमलष्करी दलाची नियुक्ती

आसाम (Assam) आणि मिझोराम (Mizoram) यांच्यात सीमेवरुन सुरु झालेल्या वादंगामुळे ईशान्य भारत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Paramilitary force
Paramilitary forceDainik Gomantak
Published on
Updated on

आसाम (Assam) आणि मिझोराम (Mizoram) यांच्यात सीमेवरुन सुरु झालेल्या वादंगामुळे ईशान्य भारत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वादाने हिंसक रुप घेतल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाची नियुक्ती (Paramilitary force) करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सीमेवरुन (Border issue) झालेल्या हिंसाचारानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमका वाद आहे तरी काय?

सीमेवरुन आसाम आणि मिझोराम राज्यांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. मागील अनेक वर्षापासून हा सीमावाद चिघळत असून वारंवार दोन्ही राज्यांमधील नागरिकांमध्ये वादंगाचे प्रसंग निर्माण होत आहेत. मात्र आता मंगळवारी या दोन राज्यामध्ये झालेला संघर्ष हा अभूतपूर्व होता. या दोन्ही राज्यांच्या सीमाभागामध्ये राहणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या झोपड्यांना सीमावर्ती राहणाऱ्या समाजकंटकांनी आग लावली. त्यानंतर सीमावादाच्या प्रश्नामुळे हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूकडील नागरिक आणि सशस्त्र बल आक्रमक झाले. आसाममधील बराक खोऱ्यामधील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामची राजधानी ऐजॉल, कोलासिब आणि मामित या तिन्ही जिल्ह्यांना लागून 164 किलोमीटरची सीमा आहे. आणि त्याबाबतच दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे.

Paramilitary force
आसाम आणि मिझोरम सीमेवर वाद; ट्विटरवर मुख्यमंत्रीही भिडले

दरम्यान, त्यातूनच मागील वर्षी ऑगस्टमध्ये आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये संघर्षाला सुरुवात झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्य़ांशी संवाद साधत तात्काळ या सीमावादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. मंगळवारी मिझोराम आणि आसामच्या नागरिकांमध्ये हिंसक झडप झाली होती. त्यामध्ये आसाम पोलिसांचे 5 जवान शहीद झाले. त्यानंतर गृहमंत्रालाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची बैठक घेतली होती. जवळपास अडिच तास सुरु असलेल्या बैठकीमध्ये आसाम आणि मिझोराम राज्यांचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com