Karnataka: माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार

येडियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांना राज्याच्या राजकारणापासून दूर देखील ठेवले जाऊ शकते. तसेच कर्नाटकात भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी येडियुरप्पा यांच्या मुलाला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Former Chief Minister of Karnataka B. S. Yeddyurappa) यांचे आता लवकरच राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) होणार.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Former Chief Minister of Karnataka B. S. Yeddyurappa) यांचे आता लवकरच राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) होणार. Dainik Gomantak

बंगळूर: मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Former Chief Minister of Karnataka B. S. Yeddyurappa) यांचे आता लवकरच राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) होणार आहे. येडियुरप्पा यांना तेलंगणाच्या राज्यपालपदाची (Governor of Telangana) जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचा निर्णय येत्या आठवडाभरात होईल अशी माहिती मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Former Chief Minister of Karnataka B. S. Yeddyurappa) यांचे आता लवकरच राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) होणार.
Karnataka हादरलं! MBA च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांच्याकडे पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल पदाची जबाबदारी आहे. आपल्याला पुदुच्चेरीचे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून नियुक्त करावे अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून सौंदरराजन यांच्याकडे पुदुच्चेरीच्या राज्यपाल पदाची पूर्णवेळ जबाबदारी देऊन तेलंगणाच्या राज्यपालपदी येडियुरप्पा यांची वर्णी लागू शकते.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Former Chief Minister of Karnataka B. S. Yeddyurappa) यांचे आता लवकरच राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) होणार.
Karnataka: मुख्यमंत्री पदाची माळ बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात

दरम्यान, येडियुरप्पा यांनी 26 जुलैला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन कुठे करण्यात येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. येडियुरप्पा यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना देखील कर्नाटकातील नवीन मंत्री मंडळात स्थान देण्यात न आल्याने येडियुरप्पा नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता येडियुरप्पांचे पुनर्वसन करुन त्यांची नाराजी केंद्र सरकार दूर करु शकते. परंतु राज्य सरकारवर येडियुरप्पा यांचा प्रभाव असल्याने त्यांना राज्याबाहेर पाठविण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे त्यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करुन, त्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर देखील ठेवले जाऊ शकते. तसेच कर्नाटकात भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी येडियुरप्पा यांच्या मुलाला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com