कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा(B. S. Yediyurappa ) यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. भाजप(BJP) कुणाला संधी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण आता अखेर कर्नाटकला आपला नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई(Basavaraj S Bommai) यांची मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आली आहे.(Karnataka Chief Minister)
बी. एस. येडियुरप्पा सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता . आणि आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डीही बेंगलोरला पोहोचले होते . आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी यांच्यासमवेत आमदार आणि राज्य मंत्र्यांची बैठक झाली, ज्यात बी.एस. येडियुरप्पा देखील उपस्थित होते. या बैठकीतच बसवराज बोम्मई यांना पुढच्या मुख्यमंत्र्यांसाठी निवडले गेले आहे.
बसवराज बोम्मई सध्या कर्नाटकचे गृहमंत्री आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात बोम्मई हे जनता परिवारातून येतात. माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे ते सुपूत्र आहेत. बसवराज यांनी 2008 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. नंतर त्यांची राजकीय वाटचाल जोरदार सुरु झाली . याआधी त्यांनी जलसिंचन खाते देखील संभाळले आहे.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काल आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री कोण होणार आणि दिल्ली हायकमांड नेमकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांनी लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री नको असे सांगितले होते, पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष हे देखील लिंगायत समाजाचे आहेत आणि त्यांचे नाव ही मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते मात्र बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपाकडून आता नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात होता आणि त्यातूनच आता बसवराज बोम्मई यांना ही संधी देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.