Karnataka River Drowning Incident: शिंपल्यांच्या शोधात गेले अन् कधीच परतले नाहीत! कर्नाटकात नदीत बुडून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

Mass Drowning Tragedy Karnataka 11 Dead: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.
Mass Drowning Tragedy Karnataka 11 Dead
Karnataka River Drowning IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Bhatkal River Drowning Incident: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. जिल्ह्यातील भटकळ परिसरातील थट्टेहक्कलु नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील आणि शेजारी राहणारे अनेक जण नदीच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेले. या भीषण अपघातात आतापर्यंत 11 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर काही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. या वेदनादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि गावावर शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, भटकळ येथील शिराली परिसरातील शारदाहोल गावातील 14 जणांचा एक समूह शनिवारी सकाळी थट्टेहक्कलु नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेला होता. या समूहामध्ये प्रामुख्याने 12 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. सर्वजण नदीच्या किनाऱ्यावर आणि पाण्यात आनंदात शिंपले शोधत होते. मात्र, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नदीच्या (River) पाण्याचा स्तर अचानक वाढला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, तिथे उपस्थित असलेल्या लोकांना स्वतःला सावरण्याची किंवा सुरक्षित ठिकाणी धावण्याची साधी संधीही मिळाली नाही. बघता बघता नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सर्वांनाच आपल्या कवेत घेतले आणि अनेक जण पाण्यात वाहून गेले.

Mass Drowning Tragedy Karnataka 11 Dead
Goa Accident Death: डिचोलीत भीषण अपघात! ट्रक आणि स्कूटरच्या धडकेत 42 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नदीत शोधमोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत नदीतून 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, यामध्ये 2 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. मृत व्यक्तींची ओळख पटली असून, त्यामध्ये लक्ष्मी मदेवा नाईक, लक्ष्मी शिवराम नाईक, मालती जट्टप्पा नाईक, मस्तम्मा मंजूनाथ नाईक, लक्ष्मी अन्नप्पा नाईक, ज्योती नाईक आणि उमेश मंजूनाथ नाईक यांच्यासह इतरांचा समावेश आहे. हे सर्व मृत एकमेकांचे नातेवाईक आणि शेजारी होते.

Mass Drowning Tragedy Karnataka 11 Dead
Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

या दुर्घटनेतून सुदैवाने चार लोकांना सुरक्षित वाचवण्यात यश आले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नदीत आणखी कोणी वाहून गेले आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे पथक अद्यापही नदीपात्रात सर्च ऑपरेशन राबवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com