Jammu And Kashmir: पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, 2022 वर्ष दहशतवाद्यांसाठी ठरले...

Jammu And Kashmir: 2022 हे वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काळ ठरले. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.
Army
ArmyDainik Gomantak

Jammu And Kashmir: 2022 हे वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काळ ठरले. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावर्षी खोऱ्यात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत 42 परदेशी दहशतवाद्यांसह एकूण 172 दहशतवादी मारले गेले.

दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) विजय कुमार यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये 93 चकमकीत हे दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले 108 दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (TRF)/लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि 35 जैश-ए-मोहम्मद (JeM) शी संबंधित होते. याशिवाय, हिज्बुल मुजाहिद्दीन (एचएम) चे 22, अल-बद्रचे 4 आणि अन्सार गजवत उल-हिंद (AGuH) चे 3 दहशतवादी (Terrorist) मारले गेले.

Army
Jammu-Kashmir: आता जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेल का?

एडीजीपी कुमार यांनी पुढे सांगितले की, 'एचएम प्रमुख फारुख नल्ली आणि लष्कर कमांडर रियाझ सेत्री वगळता सर्व दहशतवादी संघटनांचे प्रमुख आणि शीर्ष कमांडर मारले गेले. यावर्षी सर्वाधिक 74 दहशतवादी लष्कर-ए-तैयबामध्ये (Lashkar-E-Taiba) सामील झाले, त्यापैकी 18 दहशतवादी अजूनही सक्रिय आहेत. 2022 मध्ये दहशतवादी गटांमध्ये 100 जणांची नवीन भरती झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 37 टक्के कमी आहे. कमाल 74 लोक लष्कर-ए-तैयबा (LeT) मध्ये सामील झाले. एकूण भरतीपैकी 65 दहशतवादी चकमकीत मारले गेले तर 17 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. याशिवाय, 18 दहशतवादी अजूनही सक्रिय आहेत.'

'2022 मध्ये चकमकीदरम्यान 360 शस्त्रे जप्त'

अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी असेही सांगितले की, नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांच्या आयुर्मानात मोठी घट झाली आहे. या वर्षी ठार झालेल्या एकूण 65 नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांपैकी 58 सामील झाल्याच्या पहिल्या महिन्यात मारले गेले. या वर्षात चकमकी आणि मोड्यूल फोडताना 360 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 121 एके सीरीज रायफल, 08 M4 कार्बाइन आणि 231 पिस्तुलांचा समावेश आहे. याशिवाय, वेळीच आयईडी, स्टिकी बॉम्ब आणि ग्रेनेड जप्त केल्यामुळे मोठी दहशतवादी घटना टळली.'

Army
Jammu And Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, काश्मीरमध्ये तीन दहशतवादी ठार

'दहशतवाद्यांनी यावर्षी 29 नागरिकांची हत्या केली'

विजय कुमार यांनी सांगितले की, 'यावर्षी दहशतवाद्यांकडून एकूण 29 नागरिक मारले गेले, त्यापैकी 3 काश्मिरी पंडित होते. यापैकी 15 मुस्लिम, 6 हिंदू आणि 8 इतर राज्यांतील होते.' बासित दार आणि आदिल वानी वगळता या हत्येमध्ये सहभागी असलेले सर्व दहशतवादी मारले गेले असले तरी हे दोघेही लवकरच मारले जातील, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 2022 मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या 14 कर्मचार्‍यांसह एकूण 26 सुरक्षा दलाचे जवान दहशतवादी हल्ले किंवा चकमकीत शहीद झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com