Foreign Minister S Jaishankar: खलिस्तानच्या मुद्द्यावरुन जयशंकर यांचा कॅनडावर हल्लाबोल, म्हणाले, ‘’अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे...’’

Khalistan Issue: खलिस्तानी फुटरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
External Affairs Minister S Jaishankar
External Affairs Minister S JaishankarDainik Gomantak

Foreign Minister S Jaishankar Attacks Canada On The Khalistan Issue: खलिस्तानी फुटरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर याप्रकरणी गंभीर आरोप केले होते. निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडातील संबंधामध्ये कटुता आली.

यातच आता, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खलिस्तानबाबत नरमाईची भूमिका घेणाऱ्या कॅनडावर हल्लाबोल केला. जयशंकर म्हणाले की, ‘खलिस्तानी फुटीरतावादी तत्वांना राजाश्रय देऊन कॅनडाचे सरकार कायद्याच्या राज्यापेक्षा त्यांची व्होट बँक अधिक शक्तिशाली असल्याचा संदेश देत आहे.’ पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, ‘भाषण स्वातंत्र्याचा अर्थ फुटीरतावादाचे समर्थन करण्याचे स्वातंत्र्य नाही.’ ते पुढे म्हणाले की, ‘चांगल्या संबंधांसाठी आपण याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.’

External Affairs Minister S Jaishankar
S Jaishankar: ‘’जगात मोठी उलथापालथ होणार’’; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देशवासियांना दिला खास संदेश

दरम्यान, संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कॅनडामध्ये प्रवेश देण्याची आणि राहण्याची परवानगी कशी दिली जाते याबद्दलही परराष्ट्रमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. "नियमांवर आधारित समाजात लोकांची संशयास्पद पार्श्वभूमी, ते कसे आले, त्यांच्याकडे कोणते पासपोर्ट आहेत याबाबत चौकशी केली जाते," असेही ते पुढे म्हणाले. जर त्यांच्या देशात असे लोक असतील ज्यांची उपस्थिती संशयास्पद आहे, तर त्यांच्याबाबतीत कडक केली पाहजे. परंतु ते त्यांची व्होट बँक त्यांच्या देशातील कायद्यापेक्षा कशी शक्तिशाली आहे हे दाखवून देण्याचा वारंवार प्रयत्न करतात, असा घणाघातही जयशंकर यांनी केला. कॅनडामध्ये भारतीय प्रवासी संख्या सुमारे 1.8 दशलक्ष आणि आणखी एक दशलक्ष अनिवासी भारतीय देशात राहतात.

External Affairs Minister S Jaishankar
S Jaishankar: ''पूर्वीच्या सरकारमधील परराष्ट्र धोरणात मुस्लिम तुष्टीकरणाची झलक''; जयशंकर यांचं मोठं वक्तव्य (WATCH)

भारतीय स्थलांतरित कॅनडाच्या राजकारणात एक प्रभावशाली गट मानला जातो. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा हात असल्याच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडातील संबंधात कटुता आली. दरम्यान, भारत सरकारने ट्रुडो यांचे आरोप मूर्खपणाचे असल्याचे ठरवत फेटाळले होते. कॅनडाच्या भूमीवर कार्यरत असलेल्या खलिस्तान समर्थक तत्त्वांना कॅनडाकडून राजाश्रय दिला जातो, असे म्हणत भारताने निशाणा साधला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com