S Jaishankar: ‘’जगात मोठी उलथापालथ होणार’’; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देशवासियांना दिला खास संदेश

Foreign Minister S Jaishankar: येत्या काही दिवसांत जगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिला आहे.
Foreign Minister S Jaishankar
Foreign Minister S JaishankarDainik Gomantak

Foreign Minister S Jaishankar: येत्या काही दिवसांत जगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत देशाचे नेतृत्व सुरक्षित हातात असणे महत्त्वाचे आहे. परराष्ट्रमंत्री म्हणाले की, संघर्ष, सत्ताकेंद्रांमध्ये होणारे बदल आणि वाढती स्पर्धा यामुळे या दशकात जगात 'खूप गोंधळ' होईल आणि अशा परिस्थितीत देशाचे नेतृत्व मजबूत हातात असणे अत्यंत आवश्यक आहे.

जयशंकर यांनी गुरुवारी संध्याकाळी एका मुलाखतीत सांगितले की, 2020 च्या दशकाच्या अखेरीपर्यंतच्या जगाचे चित्र त्यांनी रेखाटले आहे, जे आजच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. जागतिक शक्ती संतुलनाच्या या मुल्यांकनात त्यांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारणातील त्यांच्या जवळपास 50 वर्षांच्या अनुभवावर आधारित काही चिंताजनक तथ्ये मांडली.

Foreign Minister S Jaishankar
S Jaishankar: ''पूर्वीच्या सरकारमधील परराष्ट्र धोरणात मुस्लिम तुष्टीकरणाची झलक''; जयशंकर यांचं मोठं वक्तव्य (WATCH)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत राहिलेल्या जयशंकर यांना राजकारणात आणले. जयशंकर म्हणाले की, “अनेक संघर्ष, तणाव, फूट! हे सर्व पैलू मी तुमच्यासमोर मांडत आहे, खरे तर मी या दशकाच्या उरलेल्या कालावधीसाठी अत्यंत अशांत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे चित्र रेखाटत आहे.’’

‘’अमेरिकेचा घसरलेला प्रभाव, युक्रेनमधील युद्ध, गाझामधील संघर्ष, लाल समुद्रातील हल्ले, दक्षिण चीन समुद्रातील तणाव, विविध भौगोलिक क्षेत्रांमधील दहशतवादाचे आव्हान आणि नवीन तंत्रज्ञानाचा उदय,’’ या गोष्टी उलथापालथीसाठी कारणीभूत ठरतील असे जयशंकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “माझा विश्वास आहे की आज या सर्व घडामोडी एकत्रितपणे प्रचंड उलथापालथीचे चित्र मांडत आहेत आणि या सगळ्यावर स्पर्धाही तीव्र होत आहे.’’

Foreign Minister S Jaishankar
S. Jaishankar: 'आम्ही गोष्टी रंगवत नाही...' जयशंकर यांचे अदानी प्रकरणाच्या टीकेवर प्रत्युत्तर

परराष्ट्रमंत्री म्हणाले की, जगातील परिस्थिती लक्षात घेता मतदारांनी लोकसभा निवडणुकीत अत्यंत जबाबदारीने मतदान करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन भारतामध्ये एक मजबूत, स्थिर आणि परिपक्व नेतृत्व कायम राहील. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार कायम राहावे, असे सांगत ते पुढे म्हणाले की, "माझ्या मते, आजच्या परिस्थितीत भारतीय मतदारांची ही सर्वात मोठी अग्निपरिक्षा आहे.’’ परराष्ट्र मंत्र्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, चिप्स, ड्रोन, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि तंत्रज्ञान यावरही प्रकाश टाकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com