IRCTC Goa Tour Packages: गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेट करणार असाल तर 'या' खास टुर पॅकेजविषयी घ्या जाणून...

विमान प्रवासासह, पर्यटकांना निवास, भोजनाचीही सुविधा
IRCTC Goa Tour Packages
IRCTC Goa Tour PackagesDainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Goa Tour Packages: यंदाचा ख्रिसमस सण गोव्यात साजरा करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी IRCTC ने खास पॅकेज आणले आहे. यात मित्रांसोबत, कपल म्हणून किंवा कुटूंब देखील सहभागी होऊ शकते. या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात.

आयआरसीटीसीच्या या अप्रतिम टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना फ्लाइट (कोलकाता ते गोवा फ्लाइट) द्वारे गोव्याला भेट देण्याची संधी मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे बजेट फ्रेंडली टूर पॅकेज कोलकाताच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होईल.

IRCTC Goa Tour Packages
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

याशिवाय आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे पर्यटकांना निवास आणि भोजनाचीही मोफत सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय, या पॅकेजमध्ये प्रवाशांना 4 तारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देखील दिली जाईल आणि नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल.

याशिवाय एसी वाहनांमधून प्रवाशांची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या टूर पॅकेजमध्ये पर्यटक आग्वाद किल्ला, कांदोळी, बागा, अंजुना, वागातोर बीच आणि शापोरा किल्ला, जुने गोवा चर्च (बॅसिलिका ऑफ बॉम जीझस, पुरातत्व संग्रहालय आणि पोर्ट्रेट गॅलरी), वॅक्स वर्ल्ड म्युझियम, मंगेशी मंदिर, मिरामार ही ठिकाणे पाहता येतील.

तसेच मांडवी किनारीही अनुभव घेता येईल.

IRCTC Goa Tour Packages
37th National Games साठी गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात 'स्पेशल इमर्जन्सी रूम'

या पॅकेजची किंमत

आयआरसीटीसीच्या 4 रात्री आणि 5 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये तीन लोकांसोबत प्रवास केल्यास एका व्यक्तीला 45,640 रुपये मोजावे लागतील. दोन व्यक्तींसोबत राहिल्यास एका व्यक्तीला 47,970 रुपये द्यावे लागतील. तर एका व्यक्तीसाठी 61940 रुपये मोजावे लागतील.

या टूर पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com