New Delhi: ‘इंडिया गेट’वर उभारणार नेताजींचा पुतळा

India Gate: पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन होणार, देशविदेशातील बोस कुटुंबीय हजर राहणार आहेत
Subhash Candra Bose
Subhash Candra BoseDainik Gomantak
Published on
Updated on

India Gate: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भव्य पुतळा इंडिया गेटवर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनावरण समारंभाला मुहूर्त मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबरला गुरुवारी नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. नेताजींचे देशविदेशातील कुटुंबीयही यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा पुतळा देशाच्या भारतीयांच्या नेताजींबद्दलच्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल, अशी भावना पंतप्रधानांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती हलविल्यावर सध्याच्या रिकाम्या चबुतऱ्याला नेताजींचा हा भव्य ग्रॅनाईटचा पुतळा बसल्यावर वेगळेच सौंदर्य प्राप्त होणार आहे.

Subhash Candra Bose
प्रियजनांमध्ये महिला असुरक्षित, NCRB ची धक्कादायक आकडेवारी आली समोर

सध्या इंडिया गेटवर नेताजींचा हॉलोग्रामचा पुतळा संध्याकाळी दिसत होता. पण त्यावरूनही टीका सुरू झाल्यावर तो प्रकल्पही बंद करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट (India Gate) वर नेताजी सुभाषचंद्र यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण (inuguration) केले. प्रस्तावित ग्रॅनाइटचा पुतळा याच होलोग्राम पुतळ्याची जागा घेणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार होलोग्राम पुतळा तांत्रिक बिघाडांमुळे काढून टाकण्यात आला आहे.

म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी नेताजींचा हा 30 फूट उंचीचा पुतळा उभारला आहे. नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीचे (National Modern Art Gallery) संचालक, प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक यांचाही या पुतळ्याच्या निर्मितीत सहभाग आहे. त्यांनीच यापूर्वी केदारनाथ येथील आदि शंकराचार्यांचा 12 फूट उंचीचा पुतळा तयार केला होता. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये स्थलांतरित केली. त्यानंतर येथे नेताजींचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा बसविण्याच्या योजनेवर काम सुरू झाले.

Subhash Candra Bose
मुलींना मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाची कारवाई, पोलिसांकडे मागितला रिपोर्ट

दरम्यानच्या काळात दुर्गापूजेनंतर नवरात्र या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यानंतर नवीन तारीख आली त्यानुसार नेताजींनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1943 मध्ये ज्या दिवशी ‘आझाद हिंद सरकार’ आणि ’आझाद हिंद फौज’ स्थापन केली होती त्या 21 सप्टेंबरच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नंतर जाहीर करण्यात आले. आता 8 सप्टेंबरची तारीख निश्चित झाली आहे. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राजपथाच्या दोन्ही बाजूला सेंट्रल व्हिस्टा योजनेत उभारण्यात आलेली काही उद्याने, कारंजी यांचेही उद्घाटन करण्याचे नियोजन बांधकाम विभागाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com